वन्यप्राणी उठले शेतकऱ्यांच्या जीवावर, शेतकऱ्यावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला, अधिकारी म्हणतात…

| Updated on: Mar 03, 2023 | 11:56 AM

गव्हाच्या शेतात बिबट्या आल्याची शेतकऱ्याला जाणीव झाली, त्यानंतर घाबरलेल्या शेतकऱ्यांने ओरडायला सुरुवात केली, त्याचवेळी बिथरलेल्या बिबट्याने हल्ला केला.

वन्यप्राणी उठले शेतकऱ्यांच्या जीवावर, शेतकऱ्यावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला, अधिकारी म्हणतात...
बिबट्या
Image Credit source: tv9marathi
Follow us on

गणेश सोळंकी, बुलढाणा : महाराष्ट्रात (Maharashtra) मागच्या कित्येक दिवसात प्राण्यांनी (animal attack on farmer) शेतकऱ्यांवरती हल्ला केला आहे. त्यामुळे शेतकरी शेतात जाण्यासाठी घाबरत आहेत. त्याचबरोबर शेतीला रात्री वीज पुरवठा होत असल्यामुळे शेतीचं नुकसान होत असल्याची ओरड शेतकरी करीत आहेत. रात्री शेतात अनेकदा प्राणी पाहायला मिळत असल्यामुळे अनेकांनी शेतीकडे दुर्लक्ष केलं आहे. बिबट्याचं प्रमाण अधिक असल्यामुळे शेतकरी उसाच्या शेतीत जाण्यासाठी घाबरत आहे. बुलढाणा जिल्ह्यात एका बिबट्याने शेतकऱ्यावरती जीवघेणा हल्ला केला आहे. त्यामुळे तिथले सगळे शेतकरी भयभीत झाले आहेत. त्याचबरोबर बिबट्याला (leopard attack) जेरबंद करावे अशी मागणी त्यांनी वनविभागाला केली आहे.

बिबट्याने शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला केला

बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात वन्यप्राण्यांच्या दहशतीखाली शेतकरी जगत आहेत. बिबट्या, अस्वल, लांडगे या प्राण्यांनी आता मानवीवस्ती पर्यंत शिरकाव केल्याच्या घटना वारंवार उजेडात येत आहेत. काल रात्री आठच्या सुमारास चिखली तालुक्यातील करतवाडी येथे बिबट्याने शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला केला.

गावकरी धावत आल्याने बिबट्याने पळ काढला

सुदैवाने शेतकरी या हल्ल्यातून बचावला असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. करतवाडी शिवारात शेतकरी शरद तायडे यांच्यावर बिबट्याने जीवघेणा हल्ला केला. गावाशेजारी असलेल्या गव्हाच्या शेतात बिबट्या आल्याचे तायडे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी आरडाओरड केली. यावेळी विचलित झालेल्या बिबट्याने तायडे यांच्यावर हल्ला केला. तेवढ्यात गावकरी धावत आल्याने बिबट्याने पळ काढला.

हे सुद्धा वाचा

नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

तायडे यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा परिसरात वावर आहे. मात्र वनविभागाने वेळीच दखल घेतली असती तर हा प्रसंग उद्भवला नसता. चिखली तालुक्यातील दिवठाणा, सवणा परिसरात अस्वलाची दहशत आहे. अनेकदा गाववस्तीवर अस्वलाचा वावर असल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.