शेतकरी नेता लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर हे बुलढाण्यातून लोकसभा निवडणूक लढणार आहेत. सलग तीन टर्म खासदार असलेले शिवसेने उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या विरोधात रविकांत तुपकर यांनी दंड थोपटले आहेत. रविकांत तुपकर आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. अर्ज दाखल करण्याआधी त्यांनी टीव्ही 9 मराठीशी बातचित केली. विजय निश्चित आहे. लोक माझ्या पाठिशी आहे. लोकांच्या प्रश्नांसाठी मी लढा देतोय. सामान्य शेतकऱ्यांचा मला पाठिंबा आगे, असं रविकांत तुपकर म्हणाले.
मोठ्या संख्येने नागरिक, तरुण, महिला अर्ज भरण्यासाठी येणार आहे. ही निवडणूक जनता विरुध्द नेता अशी असणार आहे. सामान्य जनता विरुध्द पांढऱ्या कपड्यातील नेता अशी निवडणूक होणार आहे. आमचा विजय निश्चित असणार आहे. तीन पक्ष एकत्रित आले तरी महायुतीचे उमेदवारांच्या गाडीत लोक बसत नाहीत, असं तुपकर म्हणाले.
अनेक संघटना पाठिंब्यासाठी येतील. लढत ही फक्त महायुतीच्या उमेदवारामध्ये आणि माझ्यात होणार आहे. एका तरुणाने माझ्यासाठी त्याच्या बायकोचे मंगळसूत्र विकले. सोबतचा अनेक लोक वर्गणी देत आहेत. भूमिपुत्र गाडीवर लिहून होत नाही. आपण कामातून दाखवून द्यायचं असतं की मी भूमिपुत्र आहे म्हणून… भूमिपुत्र आहे म्हणता तर सोयाबीन प्रश्र्नांवर किती बोलले तुम्ही?, असा सवाल रविकांत तुपकरांनी केला आहे.
ज्या ठाकरे परिवाराने त्यांना भक्कम दिले. त्यांचे झाले नाही तर सामान्य जनतेच काय होणार? महायुती आणि महाविकास आघाडीतील बंडखोरीचा फायदा निश्चित होणार आहे. भाजपमध्ये नाराजी आहे. काल माजी आमदार यांनी अर्ज भरला. बुलढाणा जिल्ह्यात महायुती मध्ये अलबेल नाही. दोन्ही पक्षात धुसफूस आहे, असं म्हणत तुपकर यांनी प्रतापराव जाधव यांच्या उमेदवारीवर भाष्य केलं.
रविकांत तुपकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पंढरपूरवरून शेतकरी बांधव आले आहेत. रविकांत तुपकर यांचा अर्ज भरण्यासाठी पंढरपूर सह इतर जिल्ह्यातून शेतकरी जिल्ह्यात दाखल झालेत. टीव्ही 9 मराठीशी बोलताना तुपकरांच्या कार्यशैलीवर भाष्य केलं. रविकांत तुपकर म्हणजे शेतकऱ्यांसाठी पांडुरंग… जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या नेत्याला दिल्लीला पाठवावं. इथल्या नेत्यांनी शेतकऱ्यांसाठी काहीच केलं नाही.आज आम्ही शेतकरी तुपकर साठी झगडणार आहोत. शेतकऱ्यांनी त्यांना पाठिंबा द्यायला पाहिजे. शेतकरी नेता दिल्लीला पाठवयाला पाहिजे, असं शेतकरी बांधव म्हणाले.