बुलढाणाः बुलढाण्यात (Buldhana) एक गंभीर घटना घडली आहे. पत्नीला कार (Car learning) शिकवायला गेलेल्या एकाची कार थेट विहिरीतच जाऊन कोसळली. दुपारी बारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या कारमध्ये पती, पत्नी आणि मुलगी असे तिघेही होते. मात्र अचानक कार रेस झाली आणि नियंत्रण सुटल्यामुळे ती थेट विहिरीत (Car fell into river) कोसळली.
या घटनेत पत्नी आणि मुलीचा बुडाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. काय विहिरीत कोसळल्यानंतर प्रत्यक्षदर्शींनी तत्काळ या कुटुंबाला वाचवण्याचे प्रयत्न सुरु केले.
घटनास्थळी नागरिकांची तोबा गर्दी जमली. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील कुंभारीची घटना आहे. विहिरीत पडलेल्या कुटुंबियांना वाचवण्यासाठी स्थानिक प्रशासनातर्फे प्रयत्न सुरु आहेत.
सद्य स्थितीत एका क्रेनच्या मदतीने पतीला बाहेर काढण्यात आले आहे. नाका-तोंडात पाणी गेल्याने त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. मात्र पत्नी आणि मुलीचा अद्याप शोध लागलेला नाही.
गावाच्या मधोमध विहिर असल्याने कार चालवताना अंदाज न आल्याने ही दुर्दैवी घटना घडली असावी, अशी चर्चा आहे.
कुंभारी येथे सदर विहिरीभोवती नागरिकांची प्रचंड गर्दी जमली आहे. उर्वरीत दोघांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.