लोकांना चार्ज होण्यासाठी च उद्धव ठाकरे यांची सभा घेतली. या गद्दारांनी गद्दारी केली नसती तर शेतकऱ्यांना कर्जमाफी नाहीतर आणखी त्याची अंमलबजावणी झाली असती. दुर्दैवाने ते झालं नाही. सभेत अनेक प्रश्नांनी उद्धव ठाकरे यांनी हात घातला. तीन वेळा त्याच मैदानावर उद्धव ठाकरे यांनी सभा घेतल्या होत्या. त्यावेळी जनतेने त्यांच ऐकलं होतं. आता सुद्धा चौथ्यांदा सभा घेतली. यावेळी सुद्धा मला निवडून आणण्यासाठी त्यांचं लोक ऐकतील. त्यांची लढाई खरंच माझ्यासोबत आहे, हे खरं बोललेत. मी दोन लाखांवर निवडून येईल आणि ते पराभूत होतील, हे सांगायचे ते विसरले, असं महाविकास आघाडीचे बुलढाण्याचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांनी म्हटलं आहे.
मेहकरचं कृषि उत्पन्न बाजार समितीचा अडत्या अशी तुमची ओळख होती. त्यांना उमेदवारी दिलीय, आमदार झाले खासदार झाले. शिवसेना प्रमुखांनी प्रथम निवडून आलेल्या व्यक्तीला मंत्रिमंडळात घायचं नाही, असं ठरविलं होतं. तरीही त्यांना पाटबंधारे आणि क्रीडा राज्यमंत्री सुद्धा केलं. एवढं दिलं असतानाही अशा पद्धतीने वागणे कोणालाच पटलं नाही. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना गद्दार म्हटलं. यात वाईट काय? त्यांनी गद्दारी केलीच आहे, असं नरेंद्र खेडेकर म्हणाले.
मागील 15 वर्षात यांनी कुणाशीही संबंध ठेवला नाही. त्यामुळे लोक म्हणतात की यांना निवडून द्यायचे नाही. काम ते दूरच राहिलं. लोक संतप्त आहेत. कारण शेतकरी आत्महत्या करता आहेत. त्यासाठी काय केल? मला कुणाचाच फटका बसणार नाही. मला लोक निवडून आणत आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
आंबेडकरी जनता प्रकाश आंबेडकर यांना कंटाळली आहे. चारशे पारची भाषा करणारे भाजपावाले महाविकास आघाडीला मतदान न करता तिसऱ्या ठिकाणी न देता आपलयाला मदत होईल. त्यांनी विचार करावा की आपले निर्णय वाकडे तिकडे घेऊ नये. भाजपाने त्यांच्या लोकांना धमकी वजा इशारा दिलाय की, ज्यांच्या मतदार संघात कमी लिड मिळेल. त्यांचा तिकिटांचा विचार करू… अनेक नेते येतील, पण त्यांना निकाल लागल्यावर कळेल. लोकांचा मुड नाही, लोक यांच्या विरोधात संतप्त आहेत, असं नरेंद्र खेडेकर यांनी म्हटलं आहे.