गणेश सोलंकी, बुलढाणा : शाळेच्या वेळेत शिक्षक (buldhana school news) हजर न झाल्याने पालकांनी शिक्षकांना चांगलेचं धारेवर धरले असल्याची चर्चा संपूर्ण बुलढाणा परिसरात पाहायला मिळत आहे. शनिवार असल्याने साडेसात ऐवजी शिक्षक आठ वाजता आल्याने पालकांनी शिक्षकांना जाब विचारला. त्याचबरोबर विद्यार्थी शाळेच्या गेटवर ताटकळत उभे राहिल्याने पालकांचा पारा चांगलाचं चढला होता. बुलढाणा (Buldhana news in marathi) येथील गांगलगाव (gangalgaon) येथील हा प्रकार असल्याची माहिती मिळाली आहे. शिक्षक नुसते पगार घेण्यासाठी आहेत का ? असा गंभीर आरोप पालकांनी केला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातल्या गांगलगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक आज शनिवार असल्याने सकाळी साडेसात ऐवजी आठ वाजता शाळेत दाखल झाले. तोपर्यंत विद्यार्थी हे शाळेच्या गेटवरच ताटकळत उभे होते अशी माहिती पालकांनी सांगितली आहे.
शिक्षक आले नसल्याचा प्रकार पालकांच्या लक्षात आला, त्यानंतर पालक शाळेसमोर जमा झाले असता. आठ वाजता चार पैकी दोन शिक्षक शाळेत आले आणि उपस्थित पालकांनी या शिक्षकांना चांगलेच धारेवर धरले. तर चार पैकी दोन शिक्षक अद्याप ही आठ वाजून गेल्यानंतर ही आले नव्हते.
त्यामुळे शिक्षक नुसतेच पगार घेण्यासाठी आहेत का ? असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे. शिक्षकांच्या या दांडीमुळे गांगलगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे आता या दांडी बहाद्दर शिक्षकांवर वरिष्ठ काय कारवाई करतात ? याकडे पालकांचं लक्ष लागले आहे.
शनिवारी सकाळी शाळा असते, हे शिक्षक विसरले असल्याची सुध्दा पालकांमध्ये चर्चा होती. शिक्षकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिक्षक सुध्दा भयभीत झाले आहेत.