Buldhana : मुलाच्या गळ्यात अडकले 10 रुपयांचे नाणे, मग सुरु झाली पळापळ, डॉक्टर म्हणाले…

| Updated on: Feb 02, 2023 | 9:01 AM

बुलढाणा जिल्ह्याच्या शेगाव तालुक्यातील वरखेड बुद्रुक येथील 14 वर्षीय मंगेश इंदोरे या मुलाने सहज म्हणून 10 रुपयाचे नाणे तोंडात ठेवले होते. अचानक ते नाणे त्याच्या घशात गेले,

Buldhana : मुलाच्या गळ्यात अडकले 10 रुपयांचे नाणे, मग सुरु झाली पळापळ, डॉक्टर म्हणाले...
Shegaon
Image Credit source: tv9marathi
Follow us on

गणेश सोळंकी, बुलढाणा : जिल्ह्यात (Buldhana) काल एक अशी घटना घडली की, त्यामुळे मुलगा चर्चेत आला आहे. मुलाच्या तोंडात दहा रुपयाचा कॉईन (10 Rupees Coin) अडकला आणि कुटुंबियासह शेजाऱ्यांची तारांबळ उडाली. ही घटना शेगाव (Shegaon) तालुक्यातील वरखेड बुद्रुक येथे घडली आहे. मुलाला अधिक त्रास होत असल्यामुळे वडिलांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याची तपासणी केल्यानंतर काही मिनिटात त्याच्या घशात अडकलेला कॉईन त्यांनी काढला, त्यामुळे डॉक्टरांचं अनेकांनी कौतुकं केलं आहे.

बुलढाणा जिल्ह्याच्या शेगाव तालुक्यातील वरखेड बुद्रुक येथील 14 वर्षीय मंगेश इंदोरे या मुलाने सहज म्हणून 10 रुपयाचे नाणे तोंडात ठेवले होते. अचानक ते नाणे त्याच्या घशात गेले, त्यामुळे त्याच्या घशात वेदना व्हायला लागल्या आणि श्वास घेण्यास ही त्याला त्रास होऊ लागला. त्याने याबाबत वडिलांना सांगितले, त्यानंतर वडिलांनी तत्काळ त्याला शेगांव येथील बालरोगतज्ज्ञ डॉ सचिन सांगळे दाखल केले.

हे सुद्धा वाचा

डॉक्टर सांगळे यांनी एक्स रे काढून नाणे अडकल्याची जागा निश्चित पाहिली, डॉक्टर सांगळे यांनी फोलिज कॅथेटरच्या मदतीने अवघ्या 40 सेकंदात या मुलाला कुठलाही त्रास न होऊ देता विनाशस्त्रक्रिया अन्ननलिकेत अडकलेले नाणे बाहेर काढले आणि मुलाला जीवदान दिलं, त्यानंतर उपस्थित सगळ्यांनी डॉक्टरांचे आभार मानले.