बुलडाणा : जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा खामगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार अॅड. आकाश फुंडकर (MLA Akash Phundkar) आणि त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी काँग्रेस नेते ज्ञानेश्वर पाटील हे एकत्र आले होते. खामगावात काल महात्मा फुले यांच्या जयंती (Mahatma Phule’s birthday) निमित्ताने आयोजित शोभायात्रेत हे दोन्ही नेते एकत्र आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. हे दोघे एकत्रच आले नाही तर आमदार फुंडकरांचे सारथी बनत पाटील यांनी बुलेट चालविली. या मिलनाची बातमी जेव्हा मतदार संघात पोहचली तेव्हा ती अनेकांना बोचणारी नक्कीच ठरत आहे. भाजपचे आमदार अॅड. आकाश फुंडकर आणि काँग्रेस नेते ज्ञानेश्वर पाटील (Congress leader Dnyaneshwar Patil) हे सध्याच्या राजकीय गणितांनुसार राजकारणातले एकमेकांचे वैरी. पण हेच राजकीय वैरी खामगावच्या महात्मा ज्योतिबा फुले मिरवणूक या सामाजिक कार्यक्रमात एकत्र आले.
यावेळी फुंडकर आणि पाटील हे अगदी गळ्यात गळे घालून गप्पा मारत मारताना पाहायला मिळाले. यामुळे मतदार संघातील कार्यकर्त्यांना वेगळाच प्रश्न पडल्या वाचून राहणार नाही. ज्या नेत्यासाठी आपण मतदार संघात विरोध दर्शवितो. प्रसंगी पोलीस केसेस ही अंगावर घेतो तेच आपले नेते विरोधकांशी गप्पा मारत बसले. आणि शहरात एकाच गाडीवर फिरले. ही बाब दोन्ही पक्षातील अनेक नेत्यांसह कार्यकर्त्यांना न आवडण्यासाखी होती. मात्र या बुलेटवरील सैरभैराची चर्चा सर्वदूर होत आहे. हे नक्की.
राजकीय प्रतिस्पर्धी एकत्र आले की कार्यकर्त्यांच्या मनात उत्सुकता असते. आपण आपल्या नेत्यांसाठी भांडतो. प्रसंगी पोलीस तक्रारी झेलतो. कोर्ट-कचेऱ्यांच्या भानगडी लावून घेतो. पण, दोन प्रतिस्पर्धी नेते एकाच बुलेटवर शोभायात्रेत प्रवास करत असतील, तर कार्यकर्ते पेचात पडतात. असेच खामगाव विधानसभा क्षेत्रातील भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते पेचात पडले. नेत्यांच्या मनात काय ते त्यांनाच माहीत. खामगावचे आमदार आकाश फुंडकर आणि काँग्रेसचे नेते ज्ञानेश्वर पाटील हे राजकीय प्रतिस्पर्धी. पण, महात्मा फुले जयंतीनिमित्त दोन्ही नेते एकत्र आले. पाटील यांनी बुलेट चालविली. फुंडकर मागे बसले. त्यामुळं कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या.