बुलढाणा : काल बुलढाण्यातील (buldhana) नागरिकांना आणि रस्त्यावर सायंकाळी प्रवास करणाऱ्या लोकांना एक भयानक प्रकार पाहायला मिळाला आहे. तो ट्रॅक्टर चालक (tractor driver) पाहिल्यापासून अनेकांना धडकी भरली आहे. काल सायंकाळी चारच्या सुमारास नागपूर,संभाजीनगर, मुंबई या जुन्या महामार्गावर एक ट्रॅक्टर चालक दारुच्या नशेत होता. त्याचबरोबर तो अनेकांना हुलकावणी देखील देत होता. त्यावेळी तिथून प्रवास करणाऱ्या लोकांनी त्या चालकाचा सगळा प्रकार मोबाईलमध्ये कैद केला आहे. त्याचबरोबर तिथल्या लोकांनी कारवाईची मागणी सुध्दा होत आहे. या प्रकरणी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली असून पोलिस (buldhana police) चालकाचा शोध घेत आहेत.
काल सायंकाळी सुमारे चार वाजता नागपूर, संभाजीनगर, मुंबई या जुन्या महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा जवळील काळापाणी जवळ एका मद्यधुंद ट्रॅक्टर चालकाने बेधुंद ट्रॅक्टर चालवत अनेक वाहनांना हुलकावणी देत हैदोस घातल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. हा ट्रॅक्टर चालक महामार्गावर बेधुंदपणे ट्रॅक्टर चालवत असल्याच, मागील एका कार चालकाने हे सर्व आपल्या मोबाईल केमेरात कैद केलं आहे. यावेळी अनेक वाहनांनी रस्त्याच्या खाली उतरून अपघात होऊ दिला नाही. हा ट्रॅक्टर चालक नेमका कोण आहे ? त्याचा शोध घेऊन त्यावर पोलिसांनी तत्काळ कारवाई करण्याची मागणी आता होत आहे.
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आनेवाडी गावाच्या हद्दीत टोलनाक्याहून साताऱ्याच्या दिशेने निघालेला टँकरवरील चालकाच्या पुलावरून उताराने जात असताना नियंत्रण सुटल्याने वाहनांच्या प्रतीक्षेत उभ्या असलेल्या दोन वृद्ध, तर एक लहान मुलीला टँकरने उडवल्याची घटना घडली आहे. यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या महिलेचा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या अपघातात नऊ वर्षाची मुलगी बचावली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातील पांडे गावातील शारदा कैलास शिर्के आणि आरती राजेंद्र कांबळे अशी मृत झालेल्या दोन महिलांची नावे आहेत. भुईंज पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित टँकर चालकाला अटक केली असून या अपघाताची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.