संदीप वानखेडे, बुलढाणा : बुलढाणा शहरातील (Buldhana city) नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दुर्लक्षित असलेल्या ब्रिटिशकालीन सरकारी तलावाचा (lake) कायापालट होणार लवकरचं होणार आहे. त्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पुढच्या सहा महिन्यात संपुर्ण तलावाचे काम संपेल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अजिंठा पर्वत (Ajanta Caves) रांगेवर वसलेल्या आणि थंड हवेचे ठिकाण असल्याने बुलढाणा शहराला इंग्रजांनी जिल्हा मुख्यालय घोषित केले होते. विशेष म्हणजे त्यावेळी इंग्रजांनी प्रत्येक कोपऱ्यात तलाव बांधले आहेत.
बुलढाणा शहरातील ब्रिटिशकालीन सरकारी तलावाकडे गेल्या अनेक वर्षापासून दुर्लक्ष होतं आहे, मात्र आता वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत या तलावाच्या सौंदर्यकरणाचे काम सुरू असून पुढील सहा महिन्यात हा तलाव जनसेवेत येईल माहिती मुख्यधिकारी गणेश पांडे यांनी दिली.
अजिंठा पर्वत रांगेवर वसलेल्या आणि त्याचबरोबर थंड हवेचे ठिकाण असल्याने बुलढाणा शहराला इंग्रजांनी त्या काळात जिल्हा मुख्यालय घोषित केले होते. इंग्रजांनी बुलढाणा शहराच्या प्रत्येक कोपऱ्यात तलाव बांधलेले आहेत. यातील एक तलाव सरकारी बगीच्याला लागून आहे. हा तलाव दुर्लक्षित असल्याने त्यामध्ये बरीचशी झाडे झुडपे वाढली होती.
शहरातील नागरिक त्या ठिकाणी कचरा आणून टाकायचे, त्यामुळे त्या तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला होता. आमदार संजय गायकवाड यांच्या पुढाकाराने बुलढाणा नगरपालिकेने वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत जवळपास पाच कोटी रुपये मंजूर करत कामाला युद्ध पातळीवर सुरुवात केली आहे. आता या तलावाच्या बाजूला धावण्यासाठी ट्रॅक, पेवर ब्लॉक, दोन प्रवेश द्वार अशी विविध विकास कामे होणार असून याठिकाणी बोटिंगची सुध्दा व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती गणेश पांडे यांनी सांगितली.