बुलढाणाः राज्यात विजेची टंचाई भासत असल्याने आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात आपात्कालीन भारनियमन (Load shading) सुरू करण्यात आले आहे, त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील (Buldhana) शहरी तसेच ग्रामीण परिसरातील काही भागात वरिष्ठांच्या आदेशावरून भारनियमन करणे सुरू झाले आहे. ऐन उन्हाळ्याच्या दिवसात लोडशेंडिंग सुरू झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत, त्यामुळे घरातील सर्व विद्युत (Electric) उपकरणे बंद झाली आहेत.
वीज नसल्यामुळे एकीकडे ही परिस्थिती आहे तर दुसरीकडे मात्र जिल्हा परिषद मुख्य कार्यलयामध्ये विजेचा अपव्यय होताना दिसत आहे. दुपारी मधली सुट्टी झाल्याने सर्व कर्मचारी घरी निघून जातात मात्र आपापल्या विभागातील सर्व फॅन, लाईट, बिनधास्त सुरू असतात. आजच नितीन राऊत यांनी स्पष्ट केले आहे की, कोळसा अपुरा असल्याने राज्यात वीज संकट येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे तर दुसरीकडे विजेचा अपव्यय होताना दिसत आहे.
कर्मचाऱ्यांची ही बाब शिक्षणाधिकारी यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी हे चुकीचे असून कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात येतील तसेच आणि आपापल्या कक्षातून बाहेर जाताना सर्व इलेक्ट्रिक दिवे बंद करुन जाण्याच्या सूचना देण्यात आल्या. कर्मचाऱ्यांबाबतीत पुन्हा असे आढळून आल्यास कारवाई केली जाईल असा दमही कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे.
राज्यात सध्या वीज संकट आहे, त्यामुळे राज्य ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले की, राज्यावरील संकट टाळण्यासाठी गुजरात राज्याकडून वीज घेण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यावरील संकट टाळायचे असेल तर विजेचा वापर जपून करण्याची गरज असल्याचे मत वीज खात्याचे मंत्री आणि अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयातही वीज जपून वापरा असे अधिकाऱ्यांना सांगण्यात येत आहे.
संबंधित बातम्या
PF : पीएफसंदर्भात महत्वाची बातमी, टॅक्स रिटर्न फाईलिंगमध्ये होऊ शकतो उशिर, वाचा आणि पटकन करा हे काम
राज्यावर वीज कपातीचे संकट; दोन दिवस पुरेल इतकाच कोळसा;नितीन राऊत यांच्याकडून स्पष्ट
Sanjay Raut : सोमय्यांबरोबर आता भाजपलाही गुन्हेगार ठरवायचे का? आता आघाडी सरकारनेच ठरवावं: संजय राऊत