काँग्रेसच्या नेत्याकडून वीज चोरीचा प्रकार, दोन वर्ष फुकटची लाईट वापरली, पथकाने केला 10 लाख रुपयांचा दंड

| Updated on: Mar 27, 2023 | 10:05 AM

मलकापूरात काँग्रेसच्या नेत्याकडून वीज चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. सव्वा दोन वर्षांपासून फुकटची वीज वापरत होते. 60 हजार 978 युनिटची चोरी केल्याने 10 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

काँग्रेसच्या नेत्याकडून वीज चोरीचा प्रकार, दोन वर्ष फुकटची लाईट वापरली, पथकाने केला 10 लाख रुपयांचा दंड
buldhana
Image Credit source: tv9marathi
Follow us on

गणेश सोळंकी, बुलढाणा : बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील मलकापूरमध्ये (Malkapur) एका मोठ्या काँग्रेसच्या (Congress Leader) नेत्याकडून आपल्या रुग्णालयात आणि आपल्या घरात वीज चोरी करण्याचा प्रकार समोर उघडकीस आला आहे. बुलढाणा विद्युत वितरणाच्या भरारी पथकाने या काँग्रेस नेत्याच्या रुग्णालय आणि घरात असलेल्या विद्युत मिटरची तपासणी केली, त्यावेळी विद्युत मीटरमध्ये छेडछाड केल्याचं समोर आलंय. यावेळी मीटरची तपासणी करून गेल्या सव्वा दोन वर्षांपासून ही वीज चोरी सुरू असल्याचे भरारी पथकाने सांगितले. 60 हजार 978 युनिटची चोरी केली असल्यामुळे विद्युत वितरणाच्या भरारी पथकाकडून या काँग्रेसच्या नेत्याला 10 लाख 47 हजार 922 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

विद्युत मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरी

कारवाई दरम्यान भरारी पथकाने या काँग्रेस नेत्याच्या रुग्णालय व घरात लावलेले विद्युत मीटर ताब्यात घेतले आहे. विद्युत वितरणाच्या भरारी पथकाकडून करण्यात आलेल्या कारवाईमुळे मलकापूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. विद्युत मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरी करणाऱ्या काँग्रेस नेत्याचे डॉ. अरविंद कोलते असे नांव असून डॉ. कोलतेंनी तीनवेळा मलकापूर विधानसभेमध्ये निवडणूक सुद्धा लढवलेली आहे. एकदा अपक्ष तर दोनदा काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर डॉ. कोलतेंनी निवडणूक लढवलेली आहे. शिवाय निवडणूक लागण्याच्या अगोदर मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डॉ. अरविंद कोलते हे मुख्य प्रशासक म्हणून कारभार पाहत होते. यामुळेच काँग्रेस नेते डॉ.अरविंद कोलते चर्चेत आले आहेत.

नागरिक सुध्दा आच्छर्य व्यक्त करीत आहेत

वीज चोरीची प्रकरणं नेहमी उघडकीस येत असतात. त्यामध्ये अधिकारी कारवाई करीत असतात. परंतु एक राजकीय व्यक्ती वीजेची चोरी करीत असल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात त्याची चर्चा आहे. दोन वर्षे वीज कंपनीच्या लक्षात ही बाब आली नसल्यामुळे लोकं सुध्दा नागरिक सुध्दा आच्छर्य व्यक्त करीत आहेत. काँग्रेसच्या नेत्याकडून दंडकडून दंडाची रक्कम वसूल करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा