काम बंद आंदोलनामुळे आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर; एकही कर्मचारी रुग्णालयात नाही…

| Updated on: Mar 15, 2023 | 2:45 PM

जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत कामबंद आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा या आरोग्य कर्मचाऱ्यांकडून घेण्यात आला असला तरी त्याचा फटका रुग्णांना बसला आहे.

काम बंद आंदोलनामुळे आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर; एकही कर्मचारी रुग्णालयात नाही...
Follow us on

बुलढाणा : राज्यात सध्या वेगवेगळ्या मुद्यांसाठी कष्टकरी, शेतकरी, कर्मचाऱ्यांनी आंदोलन छेडले आहे. शेतकऱ्यांनी नाशिक-मुंबई लाँग मार्च काढला आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांचा मंद्रूप ते मुंबई असा बैलगाडी मोर्चा निघाला आहे.तर जुनी पेन्शन योजनेसाठी पुकारेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या संघटनेमुळे सरकार गोत्यात आले. शासकीय कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारल्यामुळे आता सरकारी यंत्रणेवर भार पडला आहे. त्यातच आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्यांनीही आंदोलन पुकारल्यामुळे अत्यावश्यक सेवेत असलेल्या आरोग्य यंत्रणा आंदोलनाच्या दिवसात कोलमडली आहे.

आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांनीही आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवल्यामुळे अनेक जिल्ह्यातील कर्मचारी आता आंदोलनात सहभागी झाले आहेत.

त्याचा ताण आरोग्य खात्यावर पडला असून कर्मचारी रुग्णालयात नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील आरोग्य खात्याची परिस्थितीही गंभीर बनली असून कर्मचाऱ्यांच्या काम आंदोलनामुळे आता रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत.

 

जुनी पेन्शन योजनेसाठी बुलढाणा जिल्हा रुग्णालयातील तब्बल 73 कर्मचारी काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणाच व्हेंटिलेटरवर असल्याचे बोलले जात आहे.

जुनी पेन्शन योजनेसाठी राज्यभरातील 18 लाख शासकीय आणि निम शासकीय कर्मचारी काम बंद आंदोलन पुकारल्यानंतर या कामबंद आंदोलनाचे परिणाम आता दिसायला सुरुवात झाली आहे.

आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्यांनी आंदोलनात सहभाग नोंदवल्यामुळे रुग्णालयातील वेगवेगळ्या विभागावर त्याचा परिणाम झाला आहे.

जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी काम बंद आंदोलनात सहभागी झाले, त्यामुळे त्याचा परिणाम अनेक वेगवेगळ्या विभागावर झाला आहे. त्यामुळे त्याचा फटका अनेक रुग्णांना बसला आहे.

रुग्णालयातील 73 कर्मचारी काम बंद आंदोलनात सहभागी झाल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर असल्याचे पाहायला मिळते आहे. डॉक्टर वगळता 73 आरोग्य कर्मचारी या संपात सहभागी झाल्याने बुलढाणा जिल्हा रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर आली आहे.

येथे येणाऱ्या रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत कामबंद आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा या आरोग्य कर्मचाऱ्यांकडून घेण्यात आला असला तरी त्याचा फटका रुग्णांना बसला आहे.

रुग्णालय परिसरात या आरोग्य कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकार विरोधात असलेला आपला रोष व्यक्त केला आहे. या आंदोलनामुळे बुलढाणा जिल्ह्यातील रुग्णांचे हाल होत असून अनेक रुग्ण ताटकळत थांबले आहेत.