बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील तब्बल 300 शेतकऱ्यांच्या शेतमालाचे कोट्यवधी रुपये घेऊन व्यापारी पसार झाला. या प्रसार झालेल्या हरदेव ट्रेडर्सच्या संतोष गाडे आणि अंकुश गाडेला वाचवण्यासाठी एका शेतकरी नेत्याच्या पत्नीवर आरोप करण्यात आले. शिवसेनेने शेतकऱ्यांना सोबत घेऊन पत्रकार परिषद घेत शेतकरी नेत्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप लावले आहेत. एकीकडे हा शेतकरी नेता शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी आव आणतो. दुसरीकडे शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी त्याच्या खांद्याला खांदा लाऊन काम करणाऱ्या त्यांच्या पत्नी व्यापाऱ्याला मदत करतात.
शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये घेऊन पसार झालेल्या गाडे बंधूंना वाचवण्यासाठी न्यायालयात नादारीचे प्रकरण दाखल करत वकीलपत्र दाखल करतात. त्यामुळे या नेत्याच्या भूमिकेवर शिवसेनेने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. या संपूर्ण गंभीर प्रकरनी काहीतरी काळबेर घडलं असल्याची शंका सुद्धा शिवसेनेकडून उपस्थित करण्यात आली आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.
शेतकरी नेता रविकांत तुपकर यांनी सुद्धा आज पत्रकार परिषद घेतली. मला प्रश्न विचारायचा नैतिक अधिकार तुम्हाला नाही. असं म्हणत रविकांत तुपकर यांनी शिवसेनेच्या आमदार, खासदाराला सह पदाधिकाऱ्यांना खडसावलं. तर आमदार रायमुलकर यांनी प्रकल्पात जलसमाधी आंदोलन केलं तेव्हा ती नौटंकी होती का ?.
शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही सोडवायचे आणि तुम्ही इथं दाढ्या करायला बसलेत का ?, असा संतप्त सवाल रविकांत तुपकर यांनी शिवसेनेच्या लोकांना केलाय. या प्रकरणावरून आता शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेत चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी जलसमाधी आंदोलन करत शेतकऱ्यांसाठी नौटंकी केल्याचा आरोप शिवसेनेचे गजानन मोरे यांनी केला.
मेहकरचे शिवसेना आमदार रायमुलकर यांनी सुद्धा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाला नौटंकी म्हणून संबोधलं होतं. त्यानंतर रविकांत तुपकर यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना आमदार खासदारांसह पदाधिकाऱ्यांना चांगलंच खडसावलं आहे.
तुम्हाला मला प्रश्न विचारायचा नैतिक अधिकार नाही. तुम्ही गुवाहाटीमध्ये जाऊन एकदम ओके होता. तुम्ही सत्यमध्ये आहात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तुम्ही लढत नाही. तुम्हाला का तिथं मुंबई, दिल्लीत लोकांच्या दाढ्या करायला पाठवलं आहे का ? असाही संतप्त सवाल रविकांत तुपकरांनी केलाय . शेतकऱ्यांचे 10 कोटी रुपये पळविणाऱ्या व्यापाऱ्याला वाचवण्यासाठी शेतकरी नेत्याची बायको आली धाऊन?, असा आरोप शिवसेनेने केला. तर रविकांत तुपकर यांनी आरोप फेटाळले. रविकांत तुपकर यांची वकील पत्नी अॅड शर्वरी तुपकर समोर आल्याने एकच खळबळ माजली आहे.