बुलडाणा : भंगार असलेल्या धावत्या एसटीच्या फाटलेल्या पत्र्याने दोन तरुणाचे हात कापले गेले. ही घटना काल सकाळी घडली. घटनेनंतर संतप्त जमावाने बुलडाणा (Buldana) जिल्ह्यातील मलकापूर (Malkapur) आगार प्रमुखावर जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार घडला. मात्र आगार प्रमुख थोडक्यात बचावले. कक्षाची तोडफोड (vandalism) करण्यात आलीय.
काल सकाळी मलकापूर पिंपळगाव देवी रोडवर पोलीस भरतीसाठी व्यायाम करत होते. रस्त्यावरून धावत्या बसमागील फाटलेल्या पत्र्याने दोन तरुणांचे हात कापल्या गेले. या घटनेचा रोष व्यक्त करण्यात आला. काही जणांनी थेट मलकापूर येथील एसटी डेपोमधील आगार प्रमुखाच्या कक्षात जाऊन तोडफोड केलीय.
आगार प्रमुखावर सुद्धा जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र आगार प्रमुख दराडे यांनी तेथून पळ काढला. डेपोमधील एका जागेत जाऊन लपल्याने त्यांचा जीव वाचला . या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी एसटी स्टॅण्डवर धाव घेतली. आगार प्रमुख यांच्या कक्षाची पाहणी केली.
पोलिसांनी हल्ला करणाऱ्यांची माहिती घेतली. या घटनेने मलकापूर एसटी स्टॅण्डवर एकच गोंधळ उडाला. याठिकाणी काही काळ तणाव निर्माण झाला होता. धामणगाव पोलिसांत चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
काल सकाळी साधारण पाच वाजता मलकापूरवरून पिंपळगाव देवीसाठी एसटी बस निघाली. चालकाच्या बाजूने एसटी बसचा पत्रा बाहेर निघालेला होता. चालकाच्या निष्कलीपणा तीन जण जखमी झाले. 50 वर्षीय परमेश्वर सुरडकर हे शेतात जात असताना अपघात झाला.
23 वर्षीय विकास पांडे यांचा सकाळी रानिंग करताना एसटी बसच्या पत्र्याने हात कापले. तिसरा व्यक्ती रोडच्या बाजूला शौचास बसलेला असताना जखमी झाला. एकाचा हात तुटून बाजूला फेकल्या गेला. एसी बस धामणगाव बढे पोलीस स्टेशनचे जमा करण्यात आली.