Buldana Accident | मलकापुरात थ्रेशर मशीनमध्ये तुरी टाकता टाकता गेला तोल, युवकाच्या कमरेखालच्या भागाचा चेंदामेंदा!

| Updated on: Jan 31, 2022 | 1:53 PM

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापुरात एक भयानक घटना घडली. थ्रेशर मशीनमध्ये पाय अडकून 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तुरी टाकता टाकता या युवकाचा पाय थ्रेशर मशीनमध्ये गेला नि होत्याचं नव्हतं झालं.

Buldana Accident | मलकापुरात थ्रेशर मशीनमध्ये तुरी टाकता टाकता गेला तोल, युवकाच्या कमरेखालच्या भागाचा चेंदामेंदा!
मृतक पवन बारस्कर
Follow us on

बुलढाणा : मलकापूर तालुक्यातील भालेगाव रणगाव (Bhalegaon Rangaon in Malkapur taluka) शिवारात ही घटना घडली. पवन श्रीराम बावस्कर (Pawan Shriram Bavaskar) हा 20 वर्षीय मजुरीसाठी गेला. हा तरुण थ्रेशर मशीनवर (Thrasher machine) काम करण्यासाठी नवीन होता. अशा मशीनवर काम करण्यासाठी काही दिवस अनुभव घ्यावे लागते. त्यानंतरच व्यवस्थित काम करता येते. पण, ग्रामीण भागात काही वेळ काम कसे करतात, ते बघतात नि काम सुरू करतात. हे काही कुशलतेचे काम नाही, असं समजलं जातं. यातच या युवकाचा घात झाला. हे काम अगदी सोपे आहे. मी पण करू शकतो, असं त्याला वाटलं. मशीनमध्ये तुरी टाकणे. त्यातून तुरीचा कुटार वेगळा आणि तुरी वेगळ्या बाहेर पडतात. या तुरींना मग व्यवस्थित स्वच्छ करून वापरले जाते. मशीनमध्ये तुरी टाकल्या. ते काम व्यवस्थित झाले. शेवटचं काम सुरू होत, अशातच घात झाला.

नेमकं काय झालं

तुरी मशीममध्ये टाकण्याचे काम सुरू होते. मशीनवरचे काम करत असताना संपूर्ण तुरी काढून झाल्या. त्यानंतर शेवटच्या वेळी त्याचा मशीनमध्ये अचानक पाय गेला. मशीनमध्ये पाय जाताच तो अतिशय गंभीर जखमी झाला. त्याचे पाय निकामी झाले. कमरेखालचा भाग चेंदामेंदा झाला. तिथून बाहेर काढून त्याला मलकापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारदरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही बातमी समजताच भालेगाव रणगावमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

गावात मजुरीशिवाय नाही रोजगार

ग्रामीण भागातील रोजगार म्हणजे शेतमजुरी करणे. त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. भागात पाहिजे तसा रोजगार उपलब्ध होत नाही. त्यामुळं मिळेल ते ती मंजुरी करण्याचीही तयारी असते. अशाच प्रकारचा कुशल असलेले काम अकुशल कामगार म्हणून करायला गेला. त्यात या युवकाचा मृत्यू झाला. त्यामुळं त्याच्या पालकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. होतकरू पोरगा गेल्याने गावातही हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

एसटीचे स्टेअरिंग येणार महिला कर्मचाऱ्यांच्या हाती; काय आहे परिवहन महामंडळाचा प्लान?

Nagpur Mihan | मिहानमध्ये तारांकित हॉटेलची होणार उभारणी; रोजगार निर्मितीला कशी मिळेल चालना?

Nagpur NMC Election | नागपूर महापालिका निवडणुकीचा धुरळा; भाजपा उमेदवार निवडीसाठी करणार सर्व्हे