गणेश सोळंकी, प्रतिनिधी, बुलडाणा : सरकारी काम चार महिने थांब अशी म्हण आहे. शासकीय कर्मचाऱ्यांनी संख्या कमी झाली. कोणत्याही विभागात जा कर्मचारी कमी असल्याचे कारण दिले जाते. यातून रुग्णालयही सुटलेली नाहीत. काही रुग्णालयात योग्य मॅनपावर असला तरी काही रुग्णालये ऑक्सिजनवर असतात. सरकारी रुग्णालयात जाणारा व्यक्ती हा गरीब असतो. त्याला रुग्णसेवा मिळणे गरजेचे आहे. पण, रुग्णालयात गेल्यानंतर तिथल्या परिस्थितीवर सर्व अवलंबून असते.
अशीच एक घटना खामगाव येथे घडली. दिलीप यांची प्रकृती बिघडली. उलट्या सुरू होत्या. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. पण, तिथं गेल्यानंतर त्यांना सरकारी बाबूगिरीचा परिचय आला. डॉक्टर रात्रभर आलेच नाहीत, असं त्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. त्यामुळे युवकाला जीव गमवावा लागला.
जिल्ह्यातील खामगाव येथील रहिवासी दिलीप रामदास गोसावी या युवकाची प्रकृती खराब झाली. शनिवारी रात्री उलटी होत असल्याने खामगाव शासकीय रुग्णालयात दिलीपला भरती करण्यात आले. त्यावेळी त्यांची प्रकृती चांगली होती. मात्र आज सकाळी त्या युवकाचा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांविरोधात नातेवाईकांनी रोष व्यक्त केला. रात्रभर कुणीच डॉक्टर तपासणीसाठी आले नाही. त्यामुळे डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित डॉक्टरवर जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही. असा पावित्रा मृतकाच्या नातेवाईकांनी घेतला आहे.
खरचं या प्रकरणी काय झालं. याची चौकशी होणे गरजेचे आहे. दोषींवर कारवाई झालीच पाहिजे. वरिष्ठ या प्रकरणी कशी दखल घेतात, यावर सर्व अवलंबून आहे. मृतक युवकाचे नातेवाईक या घटनेने संतप्त झाले आहेत. दोषींवर कारवाई झालीच पाहिजे, यासाठी आग्रही आहेत. पुढं काय घडलं हे पाहण महत्त्वाचं आहे.