MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची घोड चूक ? विद्यार्थ्यांचे मार्क कमी केल्यामुळे गोंधळ

| Updated on: Mar 16, 2023 | 11:19 AM

MPSC ची घोड चूक ? PSI मुलाखतीची तयारी करणाऱ्या मुलींचे मैदानी चाचणीचे मार्क्स अचानक कमी केले असल्याचा आरोपी मुलींनी केला आहे. आयोगाकडून कुठलीच माहिती न देता मुलींचे मार्क्स कापले.

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची घोड चूक ? विद्यार्थ्यांचे मार्क कमी केल्यामुळे गोंधळ
MPSC
Image Credit source: tv9marathi
Follow us on

गणेश सोळंकी, बुलढाणा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (Maharashtra Public Service Commission) पीएसआय (PSI) या पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. मैदानी चाचणीत मुलींचे अचानक मार्क्स कापण्यात आल्याचा आरोप मुलींनी केला आहे. त्यामुळे मुलाखतीसाठी पात्र (Eligible for interview) असणाऱ्या अनेक मुली ऐन वेळेवर अपात्र ठरवल्या गेल्या आहेत. मात्र एमपीएससीकडून या मैदानी चाचणीत मुलींचे मार्क्स अचानक का कमी करण्यात आले आहेत. याबाबत कुठलाच खुलासा किंवा स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यामुळे नोकरीची आस लावून मुलाखतीची तयारी करणाऱ्या अनेक मुलींच्या आशेवर पाणी फेरल्या गेल आहे.

एमपीएससीचा भोंगळ कारभार यामुळे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. सातत्याने एमपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोग घेत असलेल्या निर्णया विरोधात आंदोलन करत आहेत. एमपीएससी आयोगाच्या ढिसाळ कारभारामुळे कित्येक वर्षापासून एमपीएससीची तयारी करणारे अनेक विद्यार्थ्यांची वयोमर्यादा होत आहेत.

यंदा मात्र मुद्दा वेगळाच आहे. एमपीएससी पीएसआय 2020 ह्या परीक्षेची चाचणी अंतिम टप्प्यात आहे. आधी पूर्व परीक्षा नंतर मुख्य परीक्षा पास करून अनेक मुली मैदानी चाचणीला सामोरे गेल्या आहेत. या मैदानी चाचणीत अनेक मुलींनी 50% च्यावर गुणप्राप्त करत मुलाखतीसाठी दणक्यात एन्ट्री मारली आहे. मात्र ऐन वेळेवर एमपीएससी कडून या मुलींना देण्यात आलेल्या मार्क्समध्ये मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आल्याची संध्या ताकतोडे या विद्यार्थींनीने माहिती दिली आहे.

हे सुद्धा वाचा

मैदानी परीक्षेदरम्यान या मुलींच्या मार्कशीटवर जे गुण देण्यात आले होते. त्यापेक्षा कितीतरी गुण कमी करून त्यांच्या एमपीएससीच्या वेबसाईटवर प्रोफाईलमध्ये अपलोड करण्यात आले आहेत. त्यामुळे एमपीएससीच्या परीक्षेच्या अंतिम टप्प्यात मुलाखतीला सामोरे जाणाऱ्या अनेक मुली ऐन वेळेवर अपात्र ठरवल्या गेल्या आहे. एमपीएससी परीक्षा पास करून नोकरीची आस बाळगणाऱ्या या मुलींच्या स्वप्नांवर एमपीएससी आयोगाकडून कुदळ चालवण्यात आरोप पूजा कुऱ्हेकर या विद्यार्थीनीने केला आहे.