“अजितदादा ज्या मस्तीत वागत होते, त्याच्या 10 टक्केही मुख्यमंत्री वागत नाहीत”; शिवसेनेच्या खासदाराची अजित पवार यांच्यावर पलटवार

| Updated on: May 20, 2023 | 8:48 PM

शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांनी खासदार संजय राऊत यांच्यावरही त्यांनी टीका केली आहे. त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करताना म्हणाले की, संजय राऊत हे तुरुंगातील दिवसावर पुस्तक लिहिणार आहेत

अजितदादा ज्या मस्तीत वागत होते, त्याच्या 10 टक्केही मुख्यमंत्री वागत नाहीत; शिवसेनेच्या खासदाराची अजित पवार यांच्यावर पलटवार
Follow us on

बुलढाणा : शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यापासून सत्ताधारी आणि विरोधक असा सामना राज्यात रंगला आहे. त्यातच शिंदे-फडणवीस सरकारच्या वेगवेगळ्या निर्णयामुळेही त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. त्यातच आता 2 हजारच्या नोटा बंदीनंतर पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. रिझर्व्ह बँकेच्या दोन हजारच्या नोटाबंदीनंतर अजित पवार यांनी राज्य आणि केंद्रावर जोरदार टीका केली होती. खासदार प्रतापराव जाधव यांनी अजित पवार यांच्यावर टीका करताना म्हणाले की, सत्तेत असताना अजित पवार ज्या मस्तीने वागत होते, त्याच्या 10 टक्केही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वागत नाहीत अशा स्पष्ट शब्दात त्यांनी अजित पवार यांना सुनावलं आहे.

अजित पवार यांच्या टीकेला खासदार प्रतापराव जाधव यांचे प्रत्युत्तर दिले आहे, तर संजय राऊत यांच्यावरही त्यांनी जोरदार टीका केली आहे.

शिंदे-फडणवीस सरकारने सत्तेची मस्ती आणि नशा डोक्यात जाऊ देऊ नये असा खोचक टोला अजित पवार यांनी राज्य सरकारला लगावला होता.

अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर आता सत्ताधाऱ्यांनी अजित पवार यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर टीका करताना प्रतापराव जाधव म्हणाले की, अजित पवार सत्तेत असताना ज्या मस्तीत वागत होते त्याच्या दहा टक्केही मुख्यमंत्री वागत नाहीत, त्यामुळे अजित पवारांचं हे वक्तव्य हास्यास्पद असल्याचा पलटवार खासदार जाधव यांनी केली आहे.

प्रतापराव जाधव यांनी अजित पवार यांच्यावर आणि महाविकास आघाडीवर टीका करताना त्यांनी म्हटले आहे की, ज्या प्रमाणे महाविकास आघाडीचे सरकार वागत होते, मात्र आता त्यांच्याप्रमाणे हे शिंदे-फडणवीस सरकार वागत नाही असा खोचक टोलाही त्यांनी अजित पवार यांना लगावला आहे.

शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांनी खासदार संजय राऊत यांच्यावरही त्यांनी टीका केली आहे. त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करताना म्हणाले की, संजय राऊत हे तुरुंगातील दिवसावर पुस्तक लिहिणार आहेत,

त्यामुळे त्यांना पुस्तक लिहिण्याची गरजच नाही. उद्धव ठाकरे यांनी त्यांना सामना हे वृत्तपत्र काहीही लिहिण्यासाठी खुला करून दिला असल्याची टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.