बुलडाणा : राज्यासह आता बुलडाण्यातही हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. उपप्रादेशिक परिवहन (Sub-Regional Transport) आणि पोलिसांकडून जनजागृती रॅली (Awareness Rally) काढण्यात आली. हेल्मेट न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणार आहे. संपूर्ण राज्यभरात हेल्मेट सक्ती संदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने आज बुलडाणा शहरात उपप्रादेशिक परिवहन आणि पोलीस विभागामार्फत शहरातून हेल्मेट वापरा संदर्भात जनजागृतीसाठी मोटारसायकल रॅली काढण्यात आली. बुलडाणा जिल्हाधिकारी (Buldana Collector) तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी हिरवी झेंडी दाखवत मोटारसायकल रॅलीला सुरुवात करण्यात आली. पहिल्या टप्प्यामध्ये सर्वच शासकीय अधिकारी, कर्मचारी त्याचबरोबर कार्यालयात येणाऱ्या अभ्यांगतांसाठी हेल्मेट सक्ती करण्यात आली. हेल्मेट न वापरणाऱ्या वर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
कायद्यानुसार हेल्मेट वापरणे आवश्यक आहे. पण, काही लोकं हेल्मेट वापरत नाहीत. त्यामुळं अलीकडच्या काळात हेल्मेट अभावी अपघातामध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने हेल्मेट सक्तीचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती परिवहन उपप्रादेशिक अधिकारी प्रसाद गाजरे यांनी दिली. बुलडाणा जिल्ह्यात पोलिसांनी जनजागृती रॅली काढली. हेल्मेट वापरा, अपघात टाळा असा संदेश या माध्यमातून देण्यात आला. हेल्मेट न वापरल्यास जीवास धोका होतो. शिवाय विनाहेल्मेट प्रवास केल्यास आता दंडही भरावा लागेल, असा संदेश या माध्यमातून देण्यात आला.
बुलडाण्यात पोलिसांनी हेल्मेट जनजागृती रॅली काढली. pic.twitter.com/5c1B8TcsQT
— Govind Hatwar (@GovindHatwar) April 4, 2022
हेल्मेट वापरल्यास अपघातझाला तरीसुद्धा होणारे नुकसान फार कमी असते. डोक्याला मार लागला नाही, तर जीव वाचविणे शक्य होते. त्यामुळं ही हेल्मेटची सक्ती आहे. या नियमांचं जनतेनं पालन करावं, यासाठी पोलिसांनी स्वतः शहरात जनजागृती केली.