भरधाव क्रेटा कारची आयशरला धडक; रणजी क्रिकेट प्रशिक्षक गंभीर जखमी तर त्यांच्या पत्नीचा मृत्यू

| Updated on: Apr 18, 2023 | 10:15 PM

रणजी क्रिकेट प्रशिक्षक प्रविण हिंगणीकर हे पत्नीसह आपल्या कारने पुण्याहून नागपूरकडे चालले होते. समृद्धी महामार्गावरुन जात असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातला.

भरधाव क्रेटा कारची आयशरला धडक; रणजी क्रिकेट प्रशिक्षक गंभीर जखमी तर त्यांच्या पत्नीचा मृत्यू
रणजी क्रिकेट प्रशिक्षक प्रविण हिंगणीकर यांच्या कारला अपघात
Image Credit source: TV9
Follow us on

बुलढाणा / संदीप वानखेडे : भरधाव कार आयशरला धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात रणजी क्रिकेट प्रशिक्षक प्रविण हिंगणीकर हे गंभीर जखमी झाले. या अपघातात हिंगणीकर यांच्या पत्नी सुवर्णा हिंगणीकर यांचा जागीच मृत्यू झाला. पुण्याहून नागपूरकडे जात असताना बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर नजीक समृद्धी महामार्गावर हा अपघात घडला. जखमी हिंगणीकर यांना उपचारासाठी मेहकर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात हिंगणीकर यांच्या कारचा चक्काचूर झाला आहे. प्रविण हिंगणीकर यांची नुकतीच बांगलादेश क्रिकेट बोर्डवर क्युरेटर म्हणून निवड झाली होती.

हिंगणीकर यांच्या कारने आयशरला धडक दिली

रणजी क्रिकेट विदर्भ संघाचे प्रशिक्षक प्रवीण हिंगणीकर हे आपल्या पत्नीसह आपल्या क्रेटा कारने पुण्याहून नागपूरकडे चालले होते. मात्र बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर नजीक समृद्धी महामार्गावर त्यांच्या भरधाव कारने आयशरला पाठीमागून धडक दिल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात प्रविण हिंगणीकर यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर प्रविण हिंगणीकर हे गंभीरित्या जखमी झाले.

प्रविण हिंगणीकर यांची प्रकृती स्थिर

प्रविण हिंगणीकर यांच्यावर सुरुवातीला मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांना मेहकर येथील गट्टानी खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी नेण्यात आले. डॉक्टर स्वप्नील सुसर, वैभव बोऱ्हाडे, गणेश शेळके यांनी त्यांच्यावर उपचार केले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. अपघातानंतर रुग्णवाहिका पायलट प्रदीप पडघान, डिंगबर शिंदे, संदीप पागोरे यांनी बचाव कार्य केले.

हे सुद्धा वाचा