विवेक गावंडे, प्रतिनिधी, बुलढाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांची न्यायालयीन कोठडीत (judicial custody) रवानगी करण्यात आली. रविकांत तुपकर यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. उद्या रविकांत तुपकर हे जामिनासाठी अर्ज करणार असल्याची माहिती आहे. बुलढाणा पोलिसांनी आज कोर्ट नंबर 4 न्यायाधीश वामन जाधव यांच्या कोर्ट रूममध्ये रविकांत तुपकर यांना हजर करण्यात आले. आरोपींची ओळख परेड झाली. काही आरोपींना मारहाण झाल्याचे न्यायालयात समक्ष निष्पन्न होत आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी करून संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याचे मागणी वकिलांच्या वतीने करण्यात आली. पोलिसांनी केलेला अमानुष लाठी चार्ज त्याचे व्हिडिओ शूट न्यायालयासमोर सादर करण्यात आले.
रविकांत तुपकर यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. तुपकर यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तुपकर यांच्यासह २५ आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. रविकांत तुपकर हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आहेत.
गजानन झांबरे नामक व्यक्ती सदर आंदोलनात सहभागी नसतानाही त्याला आरोपी बनविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. सदर व्यक्ती दुसरीकडे दिवसभर असल्याचे पुरावे आहेत. या अनुषंगाने संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी पोलीस महासंचालक यांना केलेला मेल पत्रव्यवहार न्यायालयासमोर सादर केला.
सदर प्रकरण पोलिसांकडून दडपशाही होत असल्याचा संशय न्यायालयाने व्यक्त करीत पोलिसांचा पीसीआर अमान्य केला आहे. झांबरे नामक व्यक्तीच्या पुराव्यामुळे खऱ्या अर्थाने सर्वांना जमानत मिळण्यास साहाय्य होत आहे. सर्व आरोपींना मेडिकल करण्यासाठी पाठवण्यात येत आहे.
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या आत्मदहन आंदोलन दरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रविकांत तुपकर यांच्यासह 25 कार्यकर्त्यांवर गंभीर गुन्हे दखल केले. तर रविकांत सह इतर कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटकही केली.
त्याच्या निषेधार्थ ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन केले. चिखलीजवळील मेहकर फाटा येथे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रात्रीला टायर जाळून निषेध व्यक्त केलाय. तर सरकार आणि पोलिसांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केलीय.
रविकांत तुपकर यांचे आत्मदहन आंदोलन चिघळल्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर केला. या प्रकरणात पोलिसांनी रविकांत तुपकर यांच्यासह २५ जणांवर रात्री उशिरा दंगलीचे गुन्हे दाखल केले. तसेच सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना रात्रीच चिखली पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आले होते.