भंगार बसची संख्या वाढली, ओढून नेत असलेली बस झाडावर धडकली, एसटी कोणीचं नसल्यामुळे…

| Updated on: Jun 06, 2023 | 11:30 AM

एसटी महामंडळाच्या एसटी रोज कुठे कुठे बंद पडल्याच्या पाहायला मिळत आहेत. काल बंद पडलेली एक एसटी दुसऱ्या वाहनाच्या साहाय्याने घेऊन जात असताना ती एसटी झाडावर जोरात आदळली.

भंगार बसची संख्या वाढली, ओढून नेत असलेली बस झाडावर धडकली, एसटी कोणीचं नसल्यामुळे...
टोचन करून चालवलेली एसटी बस झाडाला धडकली
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

बुलढाणा : बुलढाणा (buldhana) जिल्ह्यात भंगार बसची (st bus) संख्या वाढल्याने अनेक अपघात होत आहेत, तर दररोज कुठे ना कुठे बस रस्त्यातच बंद पडल्याच्या घटना समोर येत आहेत. जळगाव जामोद आगाराची रस्त्यात बंद पडलेली बस, दुसऱ्या बसने टोचन करून आणत असताना अचानक हुक तुटल्याने नादुरूस्त बस ही जामोद ते जळगाव मार्गावरील उसरा फाट्याजवळ रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाला (st bus accident) धडकली. त्या बसमध्ये चालकाशिवाय कुणीचं नसल्याने जीवितहाणी ठळली असल्याचे नागरिक सांगत आहेत. इतर जिल्ह्यात सुध्दा एसटीची तिचं अवस्था असल्याचे पाहायला मिळतं आहे.

नेमकं काय झालं

जळगाव जामोद आगाराची एसटी रस्त्यात बंद पडली. त्यावेळी एसटी असणाऱ्या प्रवाशांना दुसऱ्या एसटीने इतरत्र पाठवण्यात आले. त्यामुळे ती एसटी जाग्यावरचं होती. दुसऱ्या बसने त्या बंद पडलेल्या बसला आगारात आणण्याचं काम सुरु होतं. त्यावेळी हुक तुटल्यानंतर एसटी थेट झाडावर आदळली. त्यावेळी बंद गाडीत फक्त चालक होता अशी माहिती मिळाली आहे.

सांगलीच्या प्रकरणाची अजूनही चर्चा

सांगली जिल्ह्यात मागच्या आठवड्यात एसटी बसला क्लज प्लेट गेली होती. मग चालकाने जुगाड केला स्टेरिंग स्वत:च्या हातात ठेवलं अन् क्लज प्लेटला बांधलेली रशी महिला कंडक्टरच्या हातात दिली. या संपूर्ण प्रकरणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला होता. त्यावेळी लोकांनी अपघात झाला असता, तर त्याला जबाबदार कोण असा देखील प्रश्न उपस्थित केला होता.

हे सुद्धा वाचा

एसटी महामंडळाच्या गाड्या खासगी हॉटेलवरती थांबवत असल्यामुळे त्याचा सुध्दा फटका प्रवाशांना सहन करावा लागत होता. ठरवून दिलेल्या थांबा न घेतल्यामुळे कल्याण, नाशिक, शहापूर येथील प्रवाशांनी मोठा संताप व्यक्त केला होता.