बुलडाणा : मुंबई – हावडा (Mumbai-Howrah) या लोहमार्गावर असलेल्या जलंब जंक्शनवरील (alamb Junction) रेल्वेचे थांबे पूर्ववत सुरू करावे, या मागणीसाठी परिसरातील नागरिकांनी आजपासून विविध आंदोलनाला सुरुवात केलीय. यामध्ये दहा एप्रिल रोजी जलंब स्थानकावर रेल्वे रोको करीत महाराष्ट्र एक्स्प्रेस (Express) थांबविण्यात आलीय. यावेळी रेल्वे पोलीस आणि नागरिकांमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र नागरिकांची संख्या जास्त असल्याने पोलिसांच्या विरोधाला न जुमानता आंदोलन करण्यात आलंय. मुंबई – हावडा या मार्गावरील शेगाव तालुक्यात येणाऱ्या जलंब जंक्शन या रेल्वे स्थानकावर एकूण नऊ गाड्यांना आतापर्यंत अधिकृतपणे थांबा होता. मात्र कोरोना काळानंतर या सर्व गाड्यांची थांबे रद्द करण्यात आले. रेल्वेचे थांबे पूर्ववत करण्यात यावे, यासाठी गावकऱ्यांच्या वतीने वेळोवेळी निवेदने देण्यात आली.
मागील तीन दिवसांपासून विविध आंदोलन करण्यात आली. त्यानंतरही रेल्वे प्रशासनाने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. आज संतप्त आंदोलनकर्त्यांनी रेल्वेस्थानकावर पोहोचून नागपूरकडे जाणारी महाराष्ट्र एक्सप्रेस ही गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे पोलीस याशिवाय जलंब पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवत आंदोलनकर्त्यांना रेल्वे रुळावर जाण्यासाठी मज्जाव केला. बुलडाण्यातील जलंब जंक्शनवरील रेल्वेचे थांबे पूर्वरत व्हावे यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले. ग्रामस्थांनी जलंब रेल्वे स्थानकावर महाराष्ट्र एक्स्प्रेस थांबवली. रेल्वे रुळावर निदर्शने करून रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले. आतातरी रेल्वेचे थांबे सुरू करावे, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलाय.
बुलडाणा – रेल्वे थांब्यासाठी जलंब जंक्शनवर ग्रामस्थ आक्रमक pic.twitter.com/3rasrvYIdT
— Govind Hatwar (@GovindHatwar) April 10, 2022
मात्र आंदोलनकर्त्यांची संख्या जास्त असल्याने आंदोलनकर्त्यांनी रेल्वे रुळावर पोहोचून निदर्शने केलीत. यानंतर जलंब रेल्वे स्थानकावर महाराष्ट्र एक्सप्रेस पोहचल्यानंतर सदर गाडी थांबविण्यात आली. आपले आंदोलन यशस्वी झाले. या आंदोलनाची दखल रेल्वे प्रशासनाने तात्काळ घ्यावी, रेल्वेचे थांबे पूर्ववत करण्यात यावे अन्यथा याहीपेक्षा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा आंदोलनकर्ते उत्तम घोंपे यांनी दिलाय.