बुलढाणा : येथे ट्रॅव्हल्स अपघातात होरपळून २५ जण ठार झाले. जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आलं. आता जखमींनी घरी पाठवण्यासाठी व्यवस्था नाही. आयुष गाडे या युवकाला घरी जाण्यासाठी मदत करण्यात आली. असं कित्येक जखमी लोकं आहेत. यासंदर्भात शेतकरी नेते रविकांत तुपकर म्हणाले, आयुष गाडगेला मदत केली, हे आमचे कर्तव्य आहे. अशा संकटाच्या काळात मदत करता येत नसेल तर माणूस म्हणून जगण्याचा आपल्याला अधिकार नाही. एवढ्या मोठ्या अपघाताने बुलढाण्यासह महाराष्ट्र अस्वस्थ आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी सर्व जखमींना पाहीलं.
आयुष गाडगे हे या अपघातातून शिताफीने वाचले. ८० टक्के ट्रव्हल्स जळत असताना ते आतमध्ये होते. काच फोडून ते बाहेर पडले. पैसे, बॅग, मोबाईल, कागदपत्र सर्व जळाले. मागच्या ट्रॅव्हल्समधील त्यांचे काही मित्र बचाव करण्यासाठी उतरले. त्यानंतर ते संभाजीनगरच्या दिशेने उपचाराला गेले.
मृतकाच्या यादीत आयुष गाडे या युवकाचे नाव होते. पण, ते जीवंत बाहेर निघाले. याची माहिती प्रशासनाला देण्यात आली. आयुष गाडेसह चार मित्रांना वणीला जायचे होते. शक्य त्यांनी अपघातग्रस्तांना मदत केली. आयुष गाडगे यांनी सांगितलेला प्रसंग हा मन सुन्न करणारा आहे.
समृद्धी महामार्गावरच्या अशा घटना टाळायच्या असतील तर सोयीसुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. इंडियन रोड अॅक्ट असं सांगतो की, ४५ ते ५० किलोमीटरवर सोयीसुविधा तयार केल्या पाहिजे. वॉश रूप, टायटेल, बाथरूम, रेस्टरूम हवी. रेस्टारंट, पेट्रोलपंप असावे. परंतु, घाईगळबळीत सुविधा नसताना समृद्धी महामार्ग तयार केला. त्याचा परिणाम आता आपण अपघातांच्या परिणामांना सामोरे गेले पाहिजे. याची कारण मिमांशा शोधून यावर उपाययोजना केली पाहिजे.
जनता अडचणीत असते तेव्हा त्यांना मदत करण्याचे काम हे सरकारचं असते. मृतकांच्या नातेवाईकांची व्यवस्था करणे. त्यांना तिथं पोहचविणे आवश्यक आहे. प्रशासन ही व्यवस्था करणार नसेल, तर आमच्यातील माणूसकी जीवंत आहे. आम्ही त्यांची त्यांच्या घरी जाण्याची व्यवस्था करू, असंही रविकांत तुपकर यांनी म्हंटलं.