शेतकरी कैलास नागरे यांच्या रक्षा विर्सजनाच्या दिवशीच बहिणीने सरकारला सुनावलं, म्हणाल्या…

| Updated on: Mar 16, 2025 | 9:00 PM

बुलढाणा जिल्ह्यातल्या देऊळगावराजा तालुक्यातील शिवनी आरमाळ येथील राज्य पुरस्कार प्राप्त शेतकरी कैलास नागरे यांनी दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली, आज त्यांच्या रक्षा विर्सजनाचा कार्यक्रम होता.

शेतकरी कैलास नागरे यांच्या रक्षा विर्सजनाच्या दिवशीच बहिणीने सरकारला सुनावलं, म्हणाल्या...
Follow us on

बुलढाणा जिल्ह्यातल्या देऊळगावराजा तालुक्यातील शिवनी आरमाळ येथील राज्य पुरस्कार प्राप्त शेतकरी कैलास नागरे यांनी दोन दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना शेतीसाठी खडकपूर्णा प्रकल्पातून पाणी मिळावं यासाठी आत्महत्या केली, त्यानंतर पुन्हा एकदा शेती आणि शेतकऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान कैलास नागरे यांची बहीण सत्यभामा नागरे यांनी कैलास नागरे यांच्या रक्षा विसर्जन कार्यक्रमातच सरकारला खडे बोल सुनावले आहेत. यावेळी तिथे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव व स्थानिक आमदार मनोज कायंदे यांची देखील उपस्थिती होती. माझ्या भावाच्या नावासमोर आत्महत्या नाही तर बलिदान हा शब्द लावण्यात यावा,  कृषिप्रधान देशात शेतकरी आत्महत्या करतो. आणि तेही पाण्यासाठी? असा सवाल यावेळी सत्यभामा नागरे यांनी उपस्थित केला आहे.

बुलढाणा जिल्ह्यातल्या देऊळगावराजा तालुक्यातील शिवनी आरमाळ येथील राज्य पुरस्कार प्राप्त शेतकरी कैलास नागरे यांनी दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली. शेतकऱ्यांना शेतीसाठी खडकपूर्णा प्रकल्पातून पाणी मिळावं अशी त्यांची मागणी होती. मात्र त्यांची मागणी पूर्ण न झाल्यानं त्यांनी आत्महत्या केली. आज त्यांच्या रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम होता. त्यासाठी राज्यभरातील शेकडो शेतकरी शिवनी येथे आले होते. रक्षा विसर्जनाच्या कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव व स्थानिक आमदार मनोज कायंदे हे देखील उपस्थित होते.

यावेळी कैलास नागरे यांच्या भगिनी असलेल्या सत्यभामा नागरे यांनी राजकारण्यांना चांगलेच खडे बोल सुनावले. ” माझ्या भावासमोर आत्महत्या हा शब्द वापरू नका,  तर बलिदान हा शब्द वापरावा,  माझ्या भावाला हे माहीत होतं की या देशात बलिदान दिल्याशिवाय काहीही होत नाही , आणि म्हणून त्याने शेतकऱ्यांसाठी बलिदान दिलेलं आहे. हे राजकारणी लोक आपल्या देशाला कृषी प्रधान म्हणतात. पण देशाला कृषीप्रधान म्हणताना त्यांना लाजा वाटल्या पाहिजेत, असे खडेबोल यावेळी सत्यभामा नागरे यांनी सुनावले आहेत. कैलास नागरे यांनी शेतकऱ्यांना पाणी मिळावं अशी मागणी केली होती, मात्र पाणी न मिळाल्यानं त्यांनी आत्महत्या केली आहे,  त्यानंतर आता राज्यात वातावरण चांगलंच तापण्याची शक्यता आहे.