बुलडाणा : महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरात जाण्यामागे शिंदे -फडणवीस सरकार जबाबदार आहे. अशी टीका विधान परिषेदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांची बुलडाण्यात केली. महाराष्ट्रापूर्वी गुजरातच्या निवडणूक असल्याने प्रकल्प गुजरातमध्ये जात असल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रातील (Maharashtra) फॉक्सकॉन वेदांता प्रकल्प गुजरातमध्ये (Gujarat) वळवण्यात आलाय. यामुळे एक लाखापेक्षाही जास्त तरुणांचा रोजगार यामधून गेलाय. यामागे केंद्राचा हात असून शिंदे -फडणवीस सरकार याला जबाबदार असल्याची टीका अंबादास दानवे यांनी केली आहे.
बुलडाणा जिल्हा शिवसेनेच्या वतीने अंबादास दानवे यांचा सत्कार करण्यात आला. शिवसेना मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याला अंबादास दानवे आले असताना ते आज बोलत होते.
संभाजीनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रम पत्रिकेमध्ये अंबादास दानवे यांचे नाव वगळण्यात आले आहे. त्यासाठी मी वैधानिक अधिकाराचा वापर करणार असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटलं.
देशातील बारा राज्यातील शिवसेना अध्यक्ष यांनी देखील आता शिंदे गटाला समर्थन दिलं. या प्रश्नावर उत्तर देताना दानवे यांनी सांगितले की, ह्या गोष्टी होऊन गेल्यात. मात्र बाळासाहेबांना मानणारा शिवसैनिक जागेवरच आहे. त्यामुळे शिवसेनेवर काहीही परिणाम होणार नाही. बाळासाहेबांना माननारे लोकं अजूनही शिनसेनेतच आहेत. त्यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास आहे.
मंत्रालयात लागलेल्या ed च्या पाटी संदर्भात विचारले असता, दानवे म्हणाले की ते ed सरकार आहेच न मग पाट्या लागणारच…