गणेश सोळंकी, Tv9 मराठी, प्रतिनिधी, बुलढाणा : उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांचा काहीही संबंध नव्हता. संबंध होता तो राज ठाकरे यांचा. ज्यावेळी बाळासाहेबांचे बायपास झालं त्यावेळी ते एकाकी पडले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना वाटले की आपण राज्याचे नेतृत्व करावं. मात्र निवडणूक आयोगाला कार्याध्यक्ष निवडून द्यायचा होता. त्यावेळी सर्वात मोठी अडचण राज ठाकरेंची होती.
त्याचवेळी प्लॅनिंग झाले. उद्धव ठाकरे यांनी मनोहर जोशींच्या खांद्यावर बंदूक ठेवली. त्यांच्या कानात सांगितले की, राज ठाकरे यांना सांगा की उद्धव ठाकरे यांना कार्याध्यक्ष करा. असे राज ठाकरे यांना सांगायला सांगा, अशी इच्छा बाळासाहेबांची आहे.
कारण राज ठाकरे बाळासाहेबांना क्रॉस करू शकत नाही. यावेळी काहीही संबंध नसताना राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव सुचवले ते कार्याध्यक्ष पदासाठी.
त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी गेम केला तो राज ठाकरे यांचा. अशा शब्दात आमदार संजय गायकवाड यांनी गौप्यस्फोट केलाय.
बुलढाणा येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर भूमिपूजनचे भूमिपूजन झाले यावेळी आमदार गायकवाड भाषणात बोलत होते. यावेळी संजय गायकवाड यांनी राष्ट्रवादी वरही तुफान टोलेबाजी केलीय. अजित दादा म्हणाले, तुम्हाला फिरता तरी येते का.
मी म्हणतो, अजित दादा तुम्हाला काय करायचं आहे. काहीही झालं की लगेच. अजित दादांचं स्टेटमेंट. शिवसेनेच्या बाजूनं स्टेटमेंट. त्यांच्या नावाची सुपारी घेतली का. त्यांच्या नावाची साडी घालायची साडी घाला. बांगळ्या घालायच्या तर बांगळ्या घाला. आम्ही आमच्यावरील आरोप फेटाळणार म्हणजे फेटाळणार, असंही संजय गायकवाड म्हणाले.