बुलडाणा : साडेतीनशे वर्षांची परंपरा (Parampara) असलेली चिखली (Chikhali) येथील रेणुका मातेची आजपासून यात्रा महोत्सवाला सुरुवात झालीय. यात्रेनिमित्त मातेच्या वगदीला नवसाची लहान मुले लटकविणेची परंपरा आहे. भाविकांचा अशी मनोकामना आहे की, जर महिलेला मुल झाले तर ते झाल्यानंतर वगदीला लटकविलं जातंय. बुलडाणा जिल्ह्यातील चिखली हे रेणुका मातेचे जागृत देवस्थान आहे. मातेचा यात्रा महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केल्या जातोय. दरवर्षी प्रमाणे रेणुका मातेची शोभायात्रा काढण्यात येतेय. मातेच्या दर्शनासाठी परिसरातील नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील भाविक दर्शनासाठी (Darshan) येतात. यात्रेला भाविकांसाठी ठीक ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन हे व्यापारी वर्ग स्वतःहून करतात हे विशेष. कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून यात्रा बंद होती. मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानं भाविकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे.
या यात्रेचे महत्त्वाचे आकर्षण आहे ते साडेतीनशे वर्षांची परंपरा असलेली पारंपरिक पद्धतीची लाकडाची वगदी. यात्रेच्या दिवशी सकाळी रेणुका मातेची बहीण असलेली ग्राम शेलूद येथून ही वगदी काढण्यात येतेय. भाविकांचा असा समज आहे की, जर कुणाला मुल -बाळ होत नसेल तर त्या महिलेने मातेला नवस करायचा. जर मला मुल झाले तर हे लहान मुल तुझ्या वगदीला पाच वर्षे किंवा सात वर्षे, दहा वर्षे, वीस वर्षे लावीन. तेव्हा त्या मुलाचे आई वडील हे देवीला नवस करतात. तो फेडण्यासाठी आपल्या मुलाला लटकावून मातेला साडी चोळी देतात. ओटी सुद्धा भरतात. तेव्हा तो नवस पूर्ण होतो. असा समज परिसरातील भाविकांचा आहे. या वगदीला लहान-मोठे सर्व जण लटकतात, अशी माहिती विश्वस्त पंडितराव देशमुख यांनी दिली.
Chikhali Renuka Devi yatra pic.twitter.com/rwM6VvaFM2
— Govind Hatwar (@GovindHatwar) April 16, 2022