नाशिक : नाशिकच्या (Nashik) मिर्ची हॉटेल चौक येथे खाजगी बस आणि टँकरमध्ये झालेल्या अपघाताची घटना ताजी असतांना नाशिकमध्ये आणखी एका चालत्या बसला अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. सप्तशृंगी गडावर (Saptashrungi Temple) जाणाऱ्या बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आग लागल्याची बाब प्रवाशांना निदर्शनास येताच त्यांनी बसमधून बाहेर पडत आपला जीव वाचविला आहे. या घटनेत बस संपूर्ण जळून खाक झाली असून प्रवाशांनीच आगीवर नियंत्रण मिळवले आहे. नाशिक शहरातील औरंगाबाद रोडवर असलेल्या मिर्ची हॉटेल चौफुली घडलेली दुर्दैवी घटना ताजी असतांनाच सप्तशृंगी गडावरील घटणेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सुदैवाने दुसऱ्या घटनेत जीवित हाणी झाली नसूनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
नाशिकच्या औरंगाबाद रोडवर झालेल्या बस आणि टँकर अपघातात आत्तापर्यन्त 12 जणांचा मृत्यू झाला असून मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
नाशिकच्या औरंगाबाद रोडवरील घटना ताजी असतांना सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या बसलाही भीषण आग लागल्याने प्रवासी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चालत्या वाहनांना आग लागणे, अपघातानंतर वाहनांना आग लागणे इतकंच काय तर उभ्या स्थितीत असलेली वाहने देखील पेट घेऊन लागल्याने वाहनांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने राज्य परिवहन महामंडळाची बस प्रवाशांना घेऊन सप्तशृंग गडावर जात होती. यावेळी चालत्या बसने पेट घेतला.
सुदैवाने जीवित हानी झाली नसून बसचे नुकसान झाले आहेत. तर नाशिक शहरात झालेल्या दुर्घटनेत 12 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 32 जखमींवर उपचार सुरू आहे.
नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात या सर्व जखमीवर उपचार सुरू असून त्यांच्या भेटीला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते.