नंदुरबारः नंदुरबारमध्ये (Nandurbar) बसमधील (passenger) प्रवाशाचा हृदयविकाराने (heart attack) मृत्यू झाल्याची घटना घडलीय. सुरत-जामनेर बसमधून रोहिदास पाटील हे प्रवास करत होते. ते महापालिकेच्या अग्निशमन दलात फायरमन असल्याचे त्यांच्या खिशातील ओळखपत्रावरून समजले. पाटील यांना नवापूर-विसरवाडी दरम्यान अचानक त्रास सुरू झाला. त्यांच्या शेजारच्या प्रवाशांनी त्यांची अस्वस्थता पाहिली. त्यांनी चालक आणि वाहकाला सांगितले. वाहकाने लागलीच बस विसरवाडी ग्रामीण रुग्णालयाकडे वळवली. रुग्णालयात पोहचेपर्यंत पाटील यांना चक्कर आली होती. त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेत असतानाच त्यांच्यावर काळाने झडप घातली. पाटील हे जळगाव जिल्ह्यातील चोपडे येथील नातेवाईकांकडे जात असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, त्यांच्या मृत्यूने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. चालक आणि वाहकांनी प्रसंगावधानता दाखवूनही त्यांना ते वाचवू शकले नाहीत. याबद्दल अनेकांनी हळहळ व्यक्त केली.
हृदयविकाराची लक्षणे कोणती?
महिला असो किंवा पुरुष दोघांसाठी हृदयविकाराच्या झटक्याचे प्राथमिक लक्षण डोकेदुखी किंवा अस्वस्थता ठरते. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी थकवा देखील जाणवतो. सामान्य शारीरिक क्रिया किंवा हालचाली जिथे अधिक परिश्रमाची आवश्यकता नसते. मात्र, त्यावेळी थकव्याची भावना निर्माण होते. महिलांना हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीर थरथरते तसेच श्वसनास अडथळा यांसारखी लक्षणे जाणवतात. मात्र, सरळ स्थितीत बसल्यास अशा लक्षणांचे प्रमाण कमी जाणवते. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी काही दिवस महिलांना झोपेची तीव्र समस्या जाणवते. तसेच महिलांना हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी पोटदुखी किंवा पोटांत तीव्र दाब जाणवतो.
हृदयविकार कसा टाळता येईल?
हृदयविकार टाळण्यासाठी पोषक आहार घ्यावा. वजनावर नियंत्रण ठेवावे. नियमित स्वरुपात व्यायाम अत्यंत महत्वाचा आहे. किमान प्रतिदिन 30 मिनिटे, आठवड्याला 5 दिवस किंवा 150 मिनिटांचा व्यायाम आवश्यक ठरतो. वर्षातून एकदा हृद्याची तपासणी करावी. तुमच्या घरात यापूर्वीच कुणाला हृदयविकार असल्यास 5 वर्षातून एकदा सीटी कोरोनरी कॕल्शियम स्कोअरची तपासणी आवश्य करावी. धुम्रपान करणे आरोग्यासाठी अपायकारक आहे. स्वतःला तणावमुक्त ठेवा. मनमोकळ आयुष्य जगा. विशेष म्हणजे पर्याप्त झोप घ्या. नियमित 7 ते 8 तासांची पुरेशी झोप घेतल्यास हृदयविकार टाळता येऊ शकतो.