मुंबईत केबल टॅक्सी चालविण्याची तयारी, पद सांभाळताच परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

| Updated on: Dec 24, 2024 | 5:00 PM

एसटी महामंडळाच्या कारभारात अनेक त्रूटी असून त्यात सुसूत्रता आणण्यासाठी काही कटू निर्णय घ्यावे लागतील असेही परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत योग्य तो निर्णय घेतील असेही सरनाईक यांनी सांगितले.

मुंबईत केबल टॅक्सी चालविण्याची तयारी, पद सांभाळताच परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
Cable taxi in mumbai
Follow us on

मुंबईकरांची ट्रॅफीक जाममधून सुटका करण्यासाठी मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील केबल टॅक्सी चालविण्याचा प्रस्ताव परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मांडला आहे. पदभार सांभाळल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पहिलीच घोषणा मुंबईत केबल टॅक्ली चालविण्याची केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सोडवणूक करण्यासठी विविध पर्याय हाताळावे लागतील आणि केबल टॅक्सी हा एक त्यापैकी पर्याय आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

केबल टॅक्सी हा मुंबई महानगर क्षेत्रात परिवहनासाठी लोकप्रिय पर्याय होऊ शकतो. सध्या महाराष्ट्रात कोणत्याच ठिकाणी केबल टॅक्सी नाही.जर आपण १५ आसनी किंवा २० आसनांची केबळ टॅक्सी चालविली तर ट्रॅफीक जाम मधून सुटका होईल. जर आपण मेट्रो चालवू शकतो तर केबल टॅक्सी चालविण्यात कोणतीही समस्या नाही. कारण आपल्या ‘रोप वे’ उभारण्यासाठी जास्त जमीन लागणार नाही.  केबल टॅक्सी महाराष्ट्र परिवहन विभागाच्या अंतर्गत चालायला हव्यात, त्यामुळे ही प्रणाली योग्य प्रकारे चालेल असेही प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

केबल टॅक्सी काय आहे ?

केबल टॅक्सी चालविण्याची योजना याआधी केबल बस नावाने देशाचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मांडली होती. प्रताप सरनाईक यांनी देखील या संदर्भात नितीन गडकरी यांचे व्हिजन कामाला येईल असे म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

एसटी कर्मचारी बदल्या ऑनलाईन होणार

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यामधील राजकीय आणि युनियनचा हस्तक्षेप टाळण्यासाठी बदल्या ऑनलाईन करण्याचा निर्णय झाला असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे. गुजरातच्या एसटी डेपोंपाहून आपल्या येथील एसटी डेपोंचे आधुनिकीकरण केले जाणार आहे. एसटी महामंडळात सुसूत्रता आणण्यासाठी काही कटू निर्णय घ्यावे लागतील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत निर्णय घेतील असेही सरनाईक यांनी सांगितले.

रस्ते अपघात कमी करणार

परिवहन सचिव संजय सेठी यांच्याशी चर्चा करुन महाराष्ट्रातील वाहतूकीचे नवे धोरण आणि व्हिजन आखले जाणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना प्रवासी वाहतूक हवेतून करण्यासंदर्भात केबल टॅक्सीच्या विषयाचा अहवाल सादर केला जाणार आहे. जर देशात इतर ठिकाणी होते तर केबल टॅक्सी आपल्या येथे का होऊ शकत नाही. रोप वे उभारण्यासाठी केंद्राची मान्यता लागणार आहे. रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक धोरण आखावे लागणार असल्याचेही सरनाईक यांनी सांगितले.