आंदोलन करू नका हे सांगू शकत नाही, मात्र परिणामाचे भान राखणे गरजेचे, संभाजी छत्रपतींचं मोठं विधान

| Updated on: Jun 27, 2021 | 8:08 PM

"छत्रपती व्यक्ती म्हणून कोणाला आंदोलन करा किंवा करू नका हे मी सांगू शकत नाही. मात्र आंदोलनाचे काय परिणाम होतील याचं भान प्रत्येकाने राखणे गरजेचं आहे," असं संभाजी छत्रपती म्हणाले.

आंदोलन करू नका हे सांगू शकत नाही, मात्र परिणामाचे भान राखणे गरजेचे, संभाजी छत्रपतींचं मोठं विधान
SAMBHAJI CHHATRAPATI
Follow us on

कोल्हापूर : मराठा आरक्षणामुळे राज्यातील वातावरण तापलेले आहे. वेगवेगळ्या नेत्यांकडून आगामी काळात आंदोलन, मोर्चे तसेच विराट रॅली काढणार असल्याचे सांगितले आहे. शिवसंग्रामचे प्रमुख विनायक मेटे यांनी आज मुंबईमध्ये विराट बाईक रॅलीचे आयोजन केले. तसेच ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजपने काल (26 जून) राज्यभरात चक्काजाम आंदोलन केले. याच पार्श्वभूमीवर आता खासदार संभाजी छत्रपती (Sambhaji Chhatrapati) यांनी मोठे विधान केले आहे. त्यांनी “छत्रपती व्यक्ती म्हणून कोणाला आंदोलन करा किंवा करू नका हे मी सांगू शकत नाही. मात्र आंदोलनाचे काय परिणाम होतील याचं भान प्रत्येकाने राखणे गरजेचं आहे,” असं संभाजी छत्रपती यांनी म्हटलं आहे. (cant say to stop rally and protest  but everyone have to think about effect of that protest said Sambhaji Raje)

 

परिणामाचे भान राखणे गरजेचं

संभाजी छत्रपती यांची कोल्हापूरमध्ये विविध मराठा संघटना तसेच नेते आणि कार्यकर्त्यांसोबत बैठक झाली. या बैठकीनंतर ते बोलत होते. “राज्यात मूक आंदोलन थांबवले असले तरी या बैठका सुरूच राहतील. छत्रपती व्यक्ती म्हणून कोणाला आंदोलन करा किंवा करू नका हे मी सांगू शकत नाही. मात्र आंदोलनाचे काय परिणाम होतील याचं भान प्रत्येकाने राखणे गरजेचं आहे,” असे संभाजी छत्रपती म्हणाले.

बीड आणि औरंगाबादेतही बैठक

सध्याची कोरोना स्थिती आणि राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांची घेतलेली दखल यामुळे संभाजी छत्रपती यांनी राज्यातील मूक मोर्चांचे सत्र तूर्तास थांबवलेले आहे. मात्र, आंदोलन थांबवलेले असले तरी राज्यात ठिकठिकाणी बैठका सुरुच असतील असे त्यांनी यापूर्वी सांगितलेले आहे. यावर बोलताना “सरकार सोबत माझी काय चर्चा झाली; हे समाजाला कळणे गरजेचं आहे म्हणूनच आजची बैठक झाली. सरकारकडे कोणते पर्याय आहेत तेदेखील समाजाला आजच्या बैठकीत सांगितले. अशाच प्रकारची बैठक बीड आणि औरंगाबादमध्ये देखील घेणार आहे,” असे संभाजी छत्रपती म्हणाले.

माझा प्रयत्न कोल्हापूरसाठी नाही तर समाजासाठी

यावेळी बोलताना त्यांनी सारथीविषयी भाष्य केलं. “सारथीचे उपकेंद्र फक्त कोल्हापूरसाठी नाही. येत्या काही दिवसांत सारथीचे उपकेंद्रे अन्य टिकाणी देखील होतील. माझा प्रयत्न फक्त कोल्हापूरसाठी नाही तर पूर्ण समाजासाठी असतो,” असं भाष्य संभाजी छत्रपती यांनी केलं.

इतर बातम्या :

मी गोपीनाथ मुंडेंचा शिष्य, पंकजांना वडेट्टीवार म्हणतात, आपण गुरुबंधू, वाचा ओबीसी परिषदेत काय घडतंय?

झुकायला अन् वाकायला तयार, जेव्हा वडेट्टीवार ओबीसींच्या काळजाला हात घालतात, वाचा 15 मोठे मुद्दे

पटोले म्हणतात, फडणवीसांच्या नेतृत्वात केंद्रात जाऊ, बावनकुळेंच्या दुखत्या नसीवरही बोट !

(cant say to stop rally and protest  but everyone have to think about effect of that protest said Sambhaji Raje)