वर्धा : ओबीसी आरक्षण रद्द झाल्याच्या विरोधात वर्धेच्या बजाज चौकात भाजपकडून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. मात्र या आंदोलनामुळे वाहनचालकांनाही मनस्ताप सहन करावा लागला. रस्त्यातच अडकून पडल्यामुळे आंदोलन सुरु असताना वाहनचालकांनी जोरात हॉर्न वाजवून आपला संताप व्यक्त केला. आंदोलकांच्या आवाजापेक्षा हॉर्नचाच ठणाणा जास्त ऐकू येत होता. हा प्रकार कॅमेरामध्ये कैद झाला आहे. (Car Bike Riders honk horn as BJP OBC Reservation Protest causes traffic jam)
वर्ध्याच्या बजाज चौकात आंदोलन
ओबीसी आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ भाजपकडून राज्यव्यापी जेलभरो आंदोलन सुरु आहे. यासाठी वर्ध्याचे भाजप खासदार रामदास तडस यांच्या नेतृत्वात वर्ध्याच्या बजाज चौकात आंदोलन पुकारण्यात आले. शनिवारी सकाळी साडेदहा वाजल्यापासून कार्यकर्ते जमा होऊ लागले होते. सकाळी 11 वाजताच्या सुमारास आंदोलनाला सुरुवात झाली.
वाहन चालकांकडून आधी संयम
बजाज चौकाच्या उड्डाणपुलावरील वाहतूक ठप्प करण्यात आली. रस्त्याच्या दुतर्फा वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. काही वेळ वाहन चालकांनी आपला रस्ता मोकळा होण्याची वाट बघितली, मात्र रस्त्यावर भाजप कार्यकर्ते आंदोलन करतच होते. 10 ते 15 मिनिटांच्या चिकाटीनंतर वाट पाहणाऱ्या दुचाकीस्वारांच्या संयमाचा बांध फुटला.
कोंडीत अडकल्याने चालक त्रस्त
प्रत्येकानेच आपापल्या वाहनाच्या हॉर्नचा गोंगाट सुरु केला. या हॉर्नच्या आवाजात आंदोलकांचा आवाजही दबल्याचं चित्र निर्माण झालं. वाहनधारकांकडून सुरु असलेला हा आवाज संपूर्ण चौकात ऐकावयास मिळत होता. अर्ध्या तासांनी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि हा कर्कश आवाज बंद झाला.
पाहा व्हिडीओ :
….आणि वाहन धारकांच्या संयमाचा बांध सुटला, भाजपच्या ओबीसी आंदोलनादरम्यान वर्ध्यात वाहतूक कोंडीने चालक त्रस्त, वाट मोकळी करुन द्या, दुचाकीस्वारांकडून हॉर्नचा ठणाणा #OBCReservation #Wardha #HonkingHorn pic.twitter.com/uliHl2BW4D
— Anish Bendre (@BendreAnish) June 26, 2021
संबंधित बातम्या :
OBC आरक्षणाचे खरे मारेकरी कोण? फडणवीस म्हणाले, ‘लिहून घ्या, 2 नावं सांगतो!’
(Car Bike Riders honk horn as BJP OBC Reservation Protest causes traffic jam)