अकोला: राज्यातील शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे कंबरडे मोडले असतानाचा विमा कंपन्यांकडून मात्र शेतकऱ्यांना फसवण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे आता विमा कंपन्याविरोधात शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत अकोल्यात विमा कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विमा कंपनी विरोधात गुन्हा दाखल झाल्यामुळे आता अकोल्यासह राज्यात खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता या कंपनीविरोधात नेमका काय निर्णय होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे
पीक नुकसानीच्या पंचनाम्यात खोडताड प्रकरणी खदान पोलीस ठाण्यात आयसीआयसीआय लोंबार्ड या विमा कंपनीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आला आहे. तर लोंबार्ड या विमा कंपनीच्या 10 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी आंदोलन केले होते. त्यावेळीही जिल्ह्यात विविध ठिकाणी विमा कंपनीच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करुन विमा कंपन्यांना जाब विचारण्यात आला होता. त्यामुळे आता पुन्हा या प्रकरणावरून विमा कंपन्याविरोधात आवाज उठवण्यात आला आहे.
तर जिल्हातील बहुतांश शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असतानासुद्धा सदर नुकसानीच्या पंचनाम्यात काही ठिकाणी खोडताड झाल्याची बाब निदर्शनास आणली होती तर, याप्रकरणी कृषी प्रशासनाने अकोला शहरातल्या खदान पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. तर शेतकऱ्यांची 3 कोटी 95 लाखांनी फसवणूक केल्याची माहितीही समोर आली आहे.
विमा कंपनी विरोधात खदान पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यामुळे आता पुढील निर्णय काय होणार याकडे साऱ्या शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
एकीकडे राज्यातील शेतकरी अवकाळी, गारपीट आणि बाजारभावामुळे प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. तर दुसरीकडे सरकार शेतकऱ्यांना मदत देण्याऐवजी फक्त अश्वासानांची खैरात करत आहे. त्यामुळे विमा कंपन्यांकडूनही जर शेतकऱ्यांना अशी वागणून मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.