नाशिक : नाशिक शहरात आजपासून नाशिक महानगर पालिकेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. नाशिकमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज लावणाऱ्यांवर आजपासून गुन्हे दाखल होणार आहे. मनपाचे अतिक्रमण विभाग आणि विभागीय अधिकाऱ्यांचे पथक शहरात फिरणार आहे. अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर, फलक पालिका करणार जप्त असून होर्डिंग्ज काढण्याचा खर्चही संबंधित व्यक्तीकडून वसूल केला जाणार आहे. शहराचे विद्रूपीकरण आणि महसूल बुडवणाऱ्यांना चांगलाच चाप बसणार आहे. इतकंच काय तर काय मजकूर छापून वाद निर्माण होतो त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे ही मोहीम अत्यंत महत्वाची मानली जात आहे. अनधिकृत होर्डिंग्ज तपासणीसाठी क्यूआर कोड देण्यात आला आहे. तो क्यूआर कोड नसेल तरी कारवाई होणार आहे. नाशिक महानगर पालिकेच्या या मोहिने महसूल बुडवून जाहिरात करणाऱ्यांना लगाम लागणार आहे.
होर्डिंग्ज आणि विविध बॅनर लावून शहराचे विद्रूपीकरण होत आहे, शहराचे सौन्दर्य देखील धोक्यात येते, त्यात अनधिकृत होर्डिंग्ज लावून पालिकेचा महसूलही बुडविला जातो.
या सर्वांना लगाम लावण्यासाठी नाशिक महानगर पालिकेने विशेष पथक तयार केले आहे, शहरात फिरून ठिकठिकाणचे फलक तपासले जाणार आहे.
नव्याने लावण्यात येणारे होर्डिंग्जवर आता परवाना क्रमांक बरोबर क्यूआर कोडही बंधनकारक करण्यात आला आहे, ज्यावर होर्डिंग्जची संपूर्ण माहिती मिळणार आहे.
शहराचं सौन्दर्य लावण्यात येणाऱ्या होर्डिंग्जमुळे विद्रूप होत असते त्यामुळे आता हेच विद्रूपीकरण रोखले जाणार आहे, अनधिकृत होर्डिंग्ज लवणाऱ्यांना चांगलाच चाप बसणार आहे.