उस्मानाबाद : महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टी नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारची 2 स्वतंत्र पथके राज्यात येत आहेत. 20 डिसेंबर ते 26 डिसेंबर या 7 दिवसाच्या काळात दोन वेगवेगळी पथके शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करणार आहेत. अतिवृष्टीने महाराष्ट्रात अनेक शेतकऱ्यांचे पिकांचे, फळबागांचे नुकसान झाले आहे तर शेतातील जमीन देखील पाण्याने वाहून गेली आहे. अनेक घरांची पडझड तर जनावरे पुरात वाहून दगावली होती (Central Govt Sqauad Will Visit to state inspect excess rain damage)
केंद्राचे पथक 21 डिसेंबर रोजी मराठवाड्यातील उस्मानाबाद व औरंगाबाद जिल्ह्यात पाहणी करणार आहे. 22 डिसेंबर रोजी सोलापूर व पुणे येथे तर 23 डिसेंबर रोजी पुणे येथे नुकसान आढावा बैठक घेणार आहे. 24 डिसेंबर रोजी गडचिरोली व नागपूर , 25 डिसेंबर रोजी चंद्रपूर व भंडारा आणि 26 डिसेंबर रोजी नागपूर येथे आढावा बैठक घेऊन हे पथक दिल्लीकडे रवाना होणार आहे.
मराठवाडा, नागपूर आणि पुणे भागात अवकाळी पावसाने मोठे नुकसान झालेले आहे मात्र अद्याप केंद्र व राज्य सरकारची मदत मिळालेली नाही. अतिवृष्टी होऊन 2 महिने झाल्यानंतर केंद्राचे पथक येणार असून अनेक शेतकऱ्यांनी शेतीची दुरुस्ती केली आहे तर अनेक शेतकऱ्यांनी पिके काढून टाकली आहेत. त्यामुळे या पथकाला अधिकारी नेमके काय दाखवणार आणि अधिकाऱ्यांना नेमके काय दिसणार ? हे प्रश्नचिन्ह आहे. केंद्राचे पथक तात्काळ येणे अपेक्षित असताना ते उशिरा आल्याने वराती मागून घोडे असाच काहीसा प्रकार पाहायला मिळत आहे.
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस , प्रवीण दरेकर यांच्यासह अनेक मंत्री व नेत्यांनी पाहणी केली होती.
20 डिसेंबर ते 26 डिसेंबर अशी 7 दिवस दोन वेगवेगळी पथके करणार पाहणी
21 डिसेंबर रोजी उस्मानाबाद , औरंगाबाद तर 22 डिसेंबर रोजी सोलापूर व पुणे तर 23 डिसेंबर रोजी पुणे येथे आढावा बैठक
24 डिसेंबर रोजी गडचिरोली व नागपूर, 25 डिसेंबर रोजी चंद्रपूर व भंडारा आणि 26 डिसेंबर रोजी नागपूर येथे आढावा बैठक
(Central Govt Sqauad Will Visit to state inspect excess rain damage)
संबंधित बातम्या
मराठी शेतकऱ्यांपेक्षा चिनी शेतकरी श्रीमंत का? वाचा इथं उत्तर !
गल्लीपासून दिल्लीपर्यंत शेतकरी रस्त्यावर, केंद्र सरकारचे नेमके 3 अध्यादेश कोणते?