सकाळी सकाळी मध्य रेल्वे खोळंबली, टिटवाळ्याजवळ काय घडलं ?

| Updated on: Dec 14, 2024 | 8:04 AM

मध्य रेल्वेच्या टिटवाळा स्थानकाजवळ तांत्रितक बिघाड झाल्याने रेल्वे सेवेला मोठा फटका बसला आहे. सकाळी सकाळीच रेल्वे सेवा खोळंबल्यामुळे प्रवासंना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

सकाळी सकाळी मध्य रेल्वे खोळंबली, टिटवाळ्याजवळ काय घडलं ?
मध्य रेल्वे
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
Follow us on

मध्य रेल्वेच्या टिटवाळा स्थानकाजवळ तांत्रितक बिघाड झाल्याने रेल्वे सेवेला मोठा फटका बसला आहे. सकाळी सकाळीच रेल्वे सेवा खोळंबल्यामुळे प्रवासंना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे. टिटवाळा येथे वायरचा प्रॉब्लेम झाल्यामुळे लोकल पंधरा ते वीस मिनिटे उशिराने धावत आहेत. लोकलला विद्युत पुरवठा नसल्यामुळे अप आणि डाऊन दोन्ही साईड बंद आहेत. त्यामुळे अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील लोकलसेवा विस्कळीत झाली असून कामावर निघालेल्या प्रवाशांची मोठी अडचण झाली आहे. रेल्वे प्रशासनाकडून दुरुस्तीचे काम सुरू असून सेवा लवकरच पूर्ववत होण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इलेक्ट्रिक सप्लायर  ( O.H.E) मध्ये बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक शनिवारी सकाळी ठप्प झाली. यामुळे कल्याण ते इगतपुरी तसेच बदलापूर ते लोणावळा या मार्गावर सर्व लोकल एकाच जागेवर उभ्या होत्या. शनिवारी सकाळी 6 वाजून 23 मिनिटांनी ओ.एच.ई. सप्लायर बंद झाला होता.  रेल्वे प्रशासनाच्या कार्यकर्त्यांनी शर्थीचे प्रयत्न करत इलेक्ट्रिक सप्लायर मधील बिघाड दूर केला. त्यानंतर  6 वाजून 53 मिनिटांच्या सुमारासा रेल्वे वाहतूक सेवा सुरू झाली.

मात्र इलेक्ट्रिक सप्लायर मधील हा बिघाड दूर झाला असला तरी रेल्वे वाहतूक अद्यापही अर्धा तास उशिराने सुरू आहे. सकाळी घाईच्या वेळेस रेल्वे सेवा ठप्प झाल्यामुळे कामावर निघालेले कर्मचारी, तसेच कॉलेज, क्लासला निघालेले विद्यार्थी यांना मोठा त्रास सहन करावा लागला. लोकल उशीरा धावत असल्यामुळे स्टेशनवरील आणि पर्यायाने गाडीतील गर्दीही वाढली. त्यामुळे तर प्रवाशांच्या मनस्तापात आणखीनच वाढ झाली. अनेकांना लेटमार्कचा सामना करावा लागण्याची भीती सतावत आहे.