Rain Update : मुंबईसह अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता, पावसाचा अंदाज घेऊन घराबाहेर पडण्याचं हवामान खात्याचं आवाहन

| Updated on: Mar 07, 2023 | 8:57 AM

मुंबईत गेल्या २४ तासांपासून ढगाळ वातावरणासहीत गार वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. आयएमडीकडून आज मुंबईत पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Rain Update : मुंबईसह अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता, पावसाचा अंदाज घेऊन घराबाहेर पडण्याचं हवामान खात्याचं आवाहन
mumbai rain update
Image Credit source: tv9marathi
Follow us on

मुंबई : महाराष्ट्रात (maharashtra) मागच्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने (heavy rain) हजेरी लावली आहे. त्याचबरोबर आणखी काही दिवस असाच पाऊस राहणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. आज महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. काल रात्रीपासून मुंबईत ढगाळ वातावरण असून वातावरणात उष्णता वाढली आहे. काल मुंबईत तापमान ३९ डिग्रीच्यावरती होतं. मुंबईत (mumbai rain update) सुध्दा मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.

मुंबईत गेल्या २४ तासांपासून ढगाळ वातावरणासहीत गार वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. आयएमडीकडून आज मुंबईत पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पाऊस पडल्यानंतर उष्णता कमी होणार आहे. मुंबईत शहरातील काल तापमान ३९ डीग्रीवर पोहोचले होतं. पश्चिम चक्रवाताचा प्रभाव वाढत चालला आहे. त्यामुळे उत्तर भारताकडून राज्याकडे वारे वाहू लागलेत. परिणामी गारपीट तसेच पावसाच्या सरी कोसळणार असं हवामान विभाने म्हटलं आहे.

मुंबई, ठाणे, रायगड, विदर्भ तसेच पालघर या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलीये आहे. ७ मार्च रोजी विजांच्या कडकडाटात पाऊस कोसळेल तर ८ मार्च रोजी गारपीट होईल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आली आहे. त्यामुळे शेतकर्यांनी त्यांच्या पिकाची काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. पावसाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडावे असंही आवाहन हवामान खात्याने केलं आहे.

हे सुद्धा वाचा

मागच्या चार दिवसात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात अधिक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचं मोठ नुकसान झालं आहे. शेतात काढणीला आलेल्या रबी पिकाचं नुकसान झाल्यामुळे तात्काळ पंचनामा करुन सरकारने मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. त्याचबरोबर अनेक फळांच्या बागा देखील वादळी वाऱ्यामुळे भुईसपाट झाल्या आहेत. अवकाळी पावसामुळे द्राक्षांच्या बागांचं मोठं नुकसान झालं आहे.