नांदेड : राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वक्तव्य केले राज्यासह देशातील राजकारण प्रचंड तापले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासाठी आता भाजप आक्रमक होत त्यांच्यासाठी आता ठिकठिकाणी सन्मान रॅली काढण्यात येत आहे. या सन्मान रॅलीवरूनच आता राजकारण केले जात आहे.याच सन्मान रॅलीविषयी काल खासदार अमोल कोल्हे यांनीही टीका केली होती. ज्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि सावित्राबाई फुले यांच्याविषयी राज्यपालांनी वक्तव्य केली होती.
त्यावेळी का सन्मान रॅली काढण्यात आली नाही असा सवाल अमोल कोल्हे यांनी भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेला केला होता. त्याच मुद्यावरून आता ठाकरे गटाकडून हल्लाबोल केला जात आहे.
खासदार चंद्रकांत खैरे यांनी सावरकर सन्मान रॅलीविषयी बोलताना सांगितले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी फक्त भाजप आणि शिंदे गटाला राजकारण करायचे आहे. सावरकर यहे नाव फक्त राजकीय पोळी भाजण्यासाठी वापरायचे आहे असा टोला त्यांनी लगावला आहे.
काँग्रेसचे राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वक्तव्य केले. त्यानंतर राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल भाजपने ठिकठिकाणी त्यांच्याविरोधात आंदोलन करून त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. तर राहुल गांधी यांच्यावर झालेली कारवाई मागे घेण्यासाठा काँग्रेसकडून वर्षभर आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे.
त्यामुळे राहुल गांधी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी राज्यातील राजकारण प्रचंड तापले आहे. त्यावर ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी बोलताना सांगितले की, भाजपला सावरकर यांच्या नावाचा वापर फक्त राजकारणासाठी करायचा आहे. तर दुसरीकडे सावरकर यांना भारतरत्न द्या या मागणीकडे मात्र दुर्लक्ष करायचे आहे असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे.
चंद्रकांत खैरे यांनी सांगितले की, सावरकर यांना भारतरत्न द्यावा अशी मागणी आम्ही वेळोवेळी संसदेत केली आहे. मात्र त्याकडे मोदी आणि फडवणीस यांनी त्याकडे लक्ष दिलं नाही.
त्यामुळे सावरकर यांचे नातू म्हणतात त्याप्रमाणे सावरकरांचे नाव केवळ राजकारणासाठी वापरले जात आहे. सध्या सावरकर यांच्यावरून सुरू असलेल्या वादावर खैरे नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
त्यावेळी त्यांनी सांगितले की, महाविकास आघाडीची सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार आहे. त्याचवेळी भाजपकडून सावरकर सन्मान रॅलीही काढण्यात येणार असल्याचे चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.