मुंबई : शनिवारचा दिवस किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि निलेश राणे यांनी गाजवला. सोमय्यांच्या कोकण दौऱ्याने महाराष्ट्राचं लक्ष वेधलं. मात्र आज राजकारणात पुन्हा नवं ट्विस्ट आलंय. कारण यशवंत जाधवांची (Yashwant Jadhav) कथित डायरी चर्चेत आलीय. या डायरीत कुणी कुणाला कसे महागडे गिफ्ट दिले, याचा उल्लेख असल्याचा संशय भाजप नेत्यांनी व्यक्त केलाय. तर चंद्रकांत पाटलांनीही (Chandrakant Patil) यावर सावध प्रतिक्रिया दिलीय. केंद्रीय यंत्रणा आपलं काम करत आहेत. यात खूप काहीतरी होणार असल्याचं मला दिसतयं, असे सांगत, अशी डायरीत मिळत असेल तर चौकशी व्हावी, अशी मागणी चंद्रकांत पाटलांनी केलीय. माझी राऊतांकडून चेष्टा केली जाते, मात्र जे म्हणतोय ते खरं ठरतयं ठरतं आहे. हीजण सुपात आहेत, काहीजणजात्यात आहेत. तर काही जणांचं पीठ झालं आहे, असा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे.
तसेच सामना वाचणं आणि राऊतांवर बोलणं मी बंद केले आहे. कालचक्र फिरत असतं. कधी आम्ही वर होतो आज कुणीवर आहे , उद्या आम्हीही वर असू, असे सूचक विधानही पाटलांनी केले आहे. तसेच हे घाबरल नाही असे नेते सांगतात , मात्र हे घाबरले आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बॅगा भरून ठेवल्यात. किरीट सोमय्या आगे बढो हम तुन्हारे साथ है, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. तसेच एसटी कर्मचाऱ्यांना अजित पवारांनी जो इशारा दिला आहे, त्यावरही चंद्रकांत पाटलांनी भाष्य केले आहे. दादांना मी चिठ्ठी दिली एसटी कर्मचाऱ्यांसंबंधी असेह चंद्रकांत पटालांनी सांगितले आहे.
यशवंत जाधव यांनी कोविडच्या काळात 24 महिन्यांत 38 मालमत्ता खरेदी केल्या आहेत. कोविड काळात मुंबई महापालिकेला लुटलं आहे. डायरीत नेमकी काय नोंद आहे. हे मी बघीतलेलं नाही. मात्र आयकर विभाग ज्या काही नोंदी आहेत त्यासंदर्भात उचित चौकशी करेल, अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली. नागपुरात विमानतळावर आल्यानंतर फडणवीस बोलत होते. यशवंत जाधव हे माजी नगरसेवक आहेत. ते स्थायी समितीचे अध्यक्ष होते. त्यांच्याबाबत एक डायरी उघडकीस आली आहे. 2018 ते 2022 च्या दरम्यान घडी आणि दोन कोटी रुपयांच्या लेनदेणीचा उल्लेख आहे. या डायरीत 50 लाख रुपयांची घडी आणि दोन कोटी रुपये मातोश्रीला देण्यात आल्यासंदर्भात लिहिण्यात आल्याची माहिती आहे.
Video | मोदी युगात चमच्यांची जागा अंधभक्तांनी घेतली; संजय राऊतांची चंद्रकांत पाटलांवर सडकून टीका
Chandrapur | आझाद बगीच्याच्या उद्घाटनावरून गोंधळ; आमदार जोरगेवार-सुधीर मुनगंटीवार आमनेसामने