कोल्हापूर: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी पुन्हा एकदा नवा गौप्यस्फोट केला आहे. कालचक्र नेहमी फिरत असतं. ते नेहमी वर जातं, खाली येतं. खाली जातं, वर येतं. आता महाराष्ट्रात (maharashtra) तुम्ही आहात. केंद्रात आम्ही आहोत. महाराष्ट्रात आम्ही वर होतो, खाली आलो. कुणालाही अंदाज नाही. साडेसातशे कोटीचा मानवी समाज आहे. हे ठरलेलं असतं. बी प्रॅक्टिकल व्हा. 2014 ते 2019मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीला सोबत घेऊन महाविकास आघाडीचा (maha vikas aghadi) प्रयोग तीन वेळा करण्याचा प्रयत्न केला. हर्षवर्धनजींना माहीत आहे. पण त्यावेळी का नाही जमला? तर तेव्हा व्हायचं नव्हतं. आता का जमलं? तर आता व्हायचं होतं, गौप्यस्फोट चंद्रकांत पाटील यांनी केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन हा गौप्यस्फोट केला.
आम्ही 120 / 130 क्रॉस केला नाही हे दुर्दैव. थोडे कमी जास्त असते तरी अपक्षांना सोबत घेतलं असतं. मात्र जागा कमी आल्या तर भाजपला सोबत घ्यायचं नाही हे आधीच ठरलं होतं. संजय राऊत यांनी मोठी भूमिका बजावली. 2014 ते 2019 या काळात तीन वेळा महाविकास आघाडी करण्याचा प्रयत्न झाला. एकदा तर अर्थसंकल्पी अधिवेशनात प्रयत्न झाला. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे तो यशस्वी झाला नाही, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला.
देवेंद्रजी आणि मी रिझल्ट बघत बसलो होतो. त्यावेळी 161 चा आकडा गाठला. त्यानंतर आम्ही दोघांनी म्हटलं चला उद्धवजींना फोन करू आणि प्रेस कॉन्फरन्स घेऊन टाकू. तो प्रसंग ठरलेला होता डिझाईन केलेला. उद्धवजी म्हणाले माझी पीसी मी वेगळी घेणार. देवेंद्र फार हुशार आहेत. ते म्हणाले, दादा कुछ गडबड है. आपण त्यांची पीसी बघू आणि मग आपली पीसी घेऊ. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आम्हाल सर्व पर्याय खुले आहेत, असंही ते म्हणाले.
मला ज्योतिष म्हटलं हे माझं केवढं भाग्य आहे. शरद पवारांच्या प्रश्नावर संजय राऊतांनी आज कबुली दिली. धाडस लागतं. अतिशय उत्तम प्लान तयार झाला. त्यांना काम दिलं गेलं. तुम्ही फक्त भाजप आणि शिवसेनेत अंतर निर्माण करा. रोज तेल ओता. बाकी सगळं आम्ही बघतो. शेवटी काही ना काही घटना घडल्या होत्या. चांगलं प्रपोझल वाटलं. तेल घालत राहिलं तर अंतर वाढत राहिलं. त्याने खुर्ची मिळणार आहे. पण खुर्ची देऊन पूर्ण हिंदुत्वाचा प्लान उद्ध्वस्त करायचा हे उद्धवजींच्या लक्षात आलं नाही. आता तरी कोल्हापूरच्या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांच्या लक्षात यावं, असा टोला त्यांनी लगावला.
कोल्हापूरमधील हिंदुत्वादी शिवसेनेचा वोटर एकदा का काँग्रेसला मतदान करायला लागला तर तो पुन्हा शिवसेनेकडे येणार नाही. याची जाणीव झाली तर दोन ते तीन दिवसात उत्तर येईल. परंपरागत वोटरला हातावर शिक्का मारण्याची सवय लागली तर ते पुन्हा शिवसेनेकडे येणार नाहीत, असंही ते म्हणाले.
भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील, उमेदवार सत्यजित उर्फ नाना कदम यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणूकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन. https://t.co/OhDB0MHUcX
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) April 8, 2022
संबंधित बातम्या: