चंद्रपूर : सरकारी कोळसा कंपनी WCL अंतर्गत काम करणाऱ्या GRN कंस्ट्रक्शन कंपनीच्या कार्यालयात मनसेने आज (17 फेब्रुवारी) तोडफोड केली. स्थानिकांना रोजगार दिला जात नसल्याच्या मुद्द्यावरून ही तोडफोड करण्यात आली. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी जीआरएन कार्यालयातील सामानाची मोडतोड करत कंपनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच, CCTV सह वाहनांची नासधूस केल्यामुळे येथे काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार सरकारी कोळसा कंपनी WCL च्या भटाळी क्षेत्रांतर्गत GRN ही कंस्ट्रक्शन कंपनी कोळसा खोदण्याचे काम करते. या कंपनीमध्ये स्थानिकांना रोजगार दिला जात नसल्याचा आरोप येथील कामगारांनी तसेच या भागातील नागरिकांनी केला होता. या मुद्द्यावरुन मनसेने जीआरएन कंस्ट्रक्शन कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे अनेकवेळा चौकशी केली. त्यासाठी अनेकदा निवेदनही दिले. मात्र, जीआरएन या कंपनीच्या प्रशासनाने मनसे तसेच स्थानिकांच्या मागणीवर कोणतीही कार्यवाही केली नाही. परिणामी मनसेने तोडफोडीचा आक्रमक पवित्रा धारण केला.
मनसेने केलेल्या तोडफोडीचा व्हिडीओ :
यावेळी मनसेने जीआरएन कंपनीच्या कार्यलयात जाऊन येथील सामानाची तोडफोड केली. तसचे वाहनांची, येथील सीसीटीव्हींची नासधूस केल्यामुळे येथे काही प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मनसेच्या कार्यकर्त्यांनी ही तोडफोड करताच घटनास्थळी पोलीस पोहोचले. यावेळी पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, मनसेच्या कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केल्यानंतर कंपनीकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. मात्र, यानंतरही जीआरएन कंपनीने स्थानिकांना रोजगाराची संधी न दिल्यास ही कंपनी चालू न देण्याचा इशारा मनसेने दिला आहे.
‘ऐकलं नाहीत तर याद राखा, विधासभेत हक्कभंग आणणार’, मुनगंटीवारांचा निर्वाणीचा इशारा https://t.co/CnyGqVnzib @SMungantiwar @OfficeofUT @AjitPawarSpeaks @BJP4Maharashtra @ShivSena #SudhirMungantiwar #marathwada #Vidharbha #Corona
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 17, 2021
इतर बातम्या :