चंद्रपूर : चंद्रपूरचा ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प 5 दिवस पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाने एका आदेशाद्वारे 30 जूनपर्यंत कोअर भागात सफारी सुरू करण्यास परवानगी दिली होती. या प्रकल्पाच्या विविध 6 प्रवेशद्वारावरून दिवसाच्या 2 टप्प्यात ठरवून दिलेल्या क्षमतेनुसार पर्यटक गाड्यांना अनुमती दिली जाणार आहे. (Chandrapur Tadoba Andhari Tiger Reserve Project Open for Tourist)
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आजपासून 5 दिवस पर्यटकांसाठी खुला करण्यात येणार असल्याचे प्रसिद्धीपत्र जारी केले आहे. गेल्या 15 एप्रिल 2021 पासून कोरोना दुसऱ्या लाटेनंतर प्रादुर्भाव टाळण्यासाठी हा प्रकल्प बंद करण्यात आला होता. मात्र 4 जूनला राज्य शासनाच्या आदेशानुसार शहरांच्या विविध लेव्हलनुसार सामाजिक- पर्यटन कार्यक्रम राबविण्यासाठी परवानगी देण्यात आली होती.
थेट प्रवेशद्वारावर जाऊन बुकिंग करणे योग्य
त्यात 13 कोरोनाबाधित आढळून आल्यावर शहर श्रेणी 1 मध्ये समाविष्ट झाले. या दिलासादायक बातमीनंतर राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाने एका आदेशाद्वारे 30 जूनपर्यंत कोअर भागात सफारी सुरू करण्यास परवानगी दिली आहे. या प्रकल्पाच्या विविध 6 प्रवेशद्वारावरून दिवसाच्या 2 टप्प्यात ठरवून दिलेल्या क्षमतेनुसार पर्यटक गाड्यांना अनुमती दिली गेली आहे. मात्र ऑनलाईन बुकिंग प्रणाली सध्या सुरू झालेली नाही.
चंद्रपूरचा ताडोबा-अंधारी थेट प्रवेशद्वारावर जाऊन बुकिंग करावे लागणार आहे. मात्र येत्या 1 जुलैपासून पावसाळी नियमाप्रमाणे ताडोबा कोअर क्षेत्र 4 महिने बंद असणार आहे. आज पहिल्याच दिवशीच्या पहिल्या सत्रात 4 जिप्सीतून पर्यटक ताडोबात पोहोचले आहे.
ताडोबातील अर्थचक्र सुरू होण्यास मदत
त्यामुळे थेट प्रवेशद्वारावर जाऊन बुकिंग करावे लागणार आहे. येत्या 1 जुलै पासून पावसाळी नियमाप्रमाणे ताडोबा कोअर क्षेत्र 4 महिने बंद असणार आहे. ताडोबातील पर्यटन सुरू करण्यासाठी रिसॉर्ट-हॉटेल व्यावसायिक-जिप्सी ऑपरेटर यांचा व्यवस्थापन आणि सरकारवर मोठा दबाव होता. मात्र बफर क्षेत्रातील सफारी सुरू करण्यासाठी विशिष्ट नियमांसह स्वतंत्र आदेश काढले जाणार आहेत. आजच्या निर्णयामुळे ताडोबातील ठप्प झालेले अर्थचक्र सुरू होण्यास मदत मिळणार आहे. (Chandrapur Tadoba Andhari Tiger Reserve Project Open for Tourist)
संबंधित बातम्या :
मालेगावात यंत्रमाग उद्योगाला अवकळा; कापडाला मागणीच नसल्याने कारखाने पुन्हा बंद