पुणे : सत्यजित तांबे ( Satyajit Tambe ) यांना आम्ही कुठलीही ऑफर दिली नाही. त्यांनी भाजपमध्ये ( BJP ) यायचे की नाही हे ठरवायचे आहे. त्यांना स्थानिक पातळीवर भाजपने मदत केली आहे. स्थानिक पातळीवर त्यांनी मदत करायचे ठरविले होते, असं सांगत असतांना चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule ) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. भाजपचे जेष्ठ नेते तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे राजेंद्र विखे पाटील ( Rajendra vikhe patil ) यांना शेवट पर्यन्त तुम्ही उमेदवारी करा म्हणून आग्रह मी स्वतः करत होतो, मात्र त्यांनी शेवटच्या क्षणी असमर्थता दर्शवली. आणि तुल्यबळ उमेदवार नसल्याने उमेदवार देऊ शकलो नाही असेही स्वतःच चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं होतं. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागली आहे.
सत्यजित तांबे यांच्या प्रवेशाबद्दल बोलत असतांना मी कुठलीही ऑफर दिली नाही, निर्णय त्यांना घ्यायचा आहे त्यांनी भाजपमध्ये यायचे आहे की नाही असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हंटलं आहे.
तर राजेंद्र विखे, शुभांगी पाटील यांच्याकडून भाजपची उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले जात होते, त्यात राजेंद्र विखे पाटील यांनी उमेदवारी घेण्यास असमर्थता दर्शवली असेही बावनकुळे यांनी सांगितले.
तर शुभांगी पाटील यांना भाजपने उमेदवारी न दिल्याने महाविकास आघाडीच्या मदतीने शुभांगी पाटील यांनी उमेदवारी केली होती. त्यामध्ये जवळपास 40 हजार मते त्यांना मिळाली आहे.
कॉंग्रेसचे पदाधिकारी राहिलेले सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राजकीय वर्तुळात तांबे हे भाजपचे छुपे उमेदवार असल्याची चर्चा सुरू झाली होती.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यात बोलत असतांना नागपूरचा उमेदवार भाजपचा नव्हता असेही सांगत पराभवाचा कलर देऊ नका असे म्हणत महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे.
यामध्ये अमरावतीची जागा आम्ही का हारलो याबाबत नक्की विचार करू असे सांगत या निवडणुकीची तयारी पाच वर्षे आधी करावी लागते, तीन चार महीने अगोदर तयारी करून उपयोग नसतो असेही बावनकुळे यांनी म्हंटलं आहे.
आमची घरं सीमेंटची आहे, तुमची घरं मातीची आहे असे सांगत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना बावनकुळे यांनी लगावला आहे. बावनकुळे यांनी यावेळी मराठवाड्याची जागा का हारलो याबद्दल भाष्य केलं आहे.
4 फेब्रुवारीला सत्यजित तांबे त्यांची राजकीय भूमिका जाहीर करणार आहे. त्यामुळे भाजपकडून जोरदार हालचआली सुरू आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.