Check Post : पुढील 3 महिन्यात राज्यातील सर्व चेकपोस्ट होणार बंद? गृहविभागानं परिवहन विभागाला दिला महत्त्वपूर्ण आदेश

| Updated on: Apr 27, 2022 | 8:05 AM

3 महिन्यात या अभ्यास गटाला आपला अहवाल शासनाला द्यावा लागणार आहे.

Check Post : पुढील 3 महिन्यात राज्यातील सर्व चेकपोस्ट होणार बंद? गृहविभागानं परिवहन विभागाला दिला महत्त्वपूर्ण आदेश
मोठी बातमी
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मुंबई : पुढील 3 महिन्यात राज्यातील सर्व चेकपोस्ट (Check Post) बंद होण्याची शक्यता आहे. राज्यातील चेकपोस्ट बंद करण्यासंदर्भात ‘अभ्यास गटाची’ स्थापना करण्यात आली आहे. परिवहन विभागातील भ्रष्टाचाराच्या (Corruption) आरोपानंतर गृहविभागानं (Home Department) अभ्यास गटाची स्थापना केली आहे.  3 महिन्यात या अभ्यास गटाला आपला अहवाल शासनाला द्यावा लागणार आहे. तसे आदेश परिवहन विभागाला देण्यात आले आहे. आदेशाची प्रत TV9 च्या हाती लागली आहे. लवकरच राज्यातील चेकपोस्ट बाबात मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, केंद्र सरकार यांच्या निर्देशानंतर सीमा तपासणी नाके, म्हणजेच चेक पोस्ट बंद करण्याबाबत अभ्यासगट तयार करण्यास मान्यता देण्यात आली आहे. हा अभ्यासगट चेक पोस्ट बंद केले तर त्याचे परिणाम काय होती आणि त्यावरच्या उपाययोजनांच्या बाबतीच अभ्यास करुन एक अहवाल सादर करणार आहे. या अहवालानंतर चेंक पोस्ट बंद करण्याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

अभ्यास गट नेमकं काय काय करणार?

अभ्यास गटाद्वारे चेकनाके बंद करण्याच्या कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत अभ्यास करेल. त्याचप्रमाणे जर चेक पोस्ट बंद करण्याचा निर्णय झाला, तर त्याची अंमलबजावणी कोणत्या प्रकारे करायची, याचाही अहवाल सादर करावा लागणार आहे.

चेकपोस्ट बंद केल्यास त्याचा राज्य सरकारवर किती आर्थिक भार पडेल, याबाबतचे परिणाम आणि उपाययोजना काय असतील, हे देखील अहवालातून स्पष्ट करण्यात येणार आहे. येत्या तीन महिन्यात याबाबतचा अहवाल सादर करुन चेक पोस्ट बंद करण्याबाबतचा निर्णय जारी केला जाण्याची शक्यता आहे.

अभ्यास गटामध्ये कुणाकुणाचा समावेश?

गृह विभागाकडून देण्यात आलेल्या आदेशानंतर अभ्यास गटात परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली अहवाल तयार केला जाणार आहे. तर इतर पाच सदस्यही या अभ्यास गटाचा भाग असतील. त्यांच्यात परिवहन उपायुक्त दिनकर मनवर, लेखा उपायुक्त तुळशीदास सोळंकी, परिवहन उपायुक्त राजेंद्र मदने आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांचाही समावेश असणार आहे.

पाहा व्हिडीओ :