राज्यातील महाआघाडी सरकारला जादा यश मिळाल्यानंतर महायुतीत धुसफूस सुरु झाली आहे. महायुतीत नाशिकच्या जागेसाठी केंद्रातून पाठिंबा मिळूनही संधी न मिळल्याने नाराज असलेले अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सध्या आपल्याच सरकार विरोधात बोलायाला सुरुवात केली आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांच्या नाराजीबद्दल त्यांनी अलिकडे केलेल्या सूचक वक्तव्यांचा अर्थ लावला जात आहे. यावर आता विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील आता भाष्य केले आहे.
मंत्री छगन भुजबळ यांनी आपण नाराज असल्याचे संकेत दिले आहेत. कधी काही गोष्टी मिळतात कधी नाही. भुजबळांना नाशिक येथून तिकीट मिळण्याची आशा होती. त्यानंतर आता राज्य सभेतही संधी हातची गेल्याने भुजबळ यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. राज्य सभेवर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून त्यांच्या लोकसभेला हरलेल्या अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे भुजबळ यांनी आता पुन्हा ओबीसींना एकटवण्याचा नारा दिला आहे. आपण लक्ष्मण हाके आणि इतरांच्या उपोषण आंदोलनाला पाठिंबा देऊ असेही त्यांनी म्हटले आहे.
मंत्री छगन भुजबळ यांनी आपण नाराज असल्याचे संकेत दिले आहेत. भुजबळ साहेब ज्या प्रकारे वक्तव्यं करीत आहेत. त्याचा अर्थ ते नाराज आहेत. मात्र, भुजबळ साहेब एवढे वरीष्ठ आहेत की त्यांच्या शब्दाचा अर्थ समुद्रातील तळाला जाऊन मासे पकडण्यासारखा आहे. भुजबळ यांच्या शब्दाचा अर्थ अधिवेशनाच्या आधीच कळेल अशा शब्दात कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी इशारा दिला आहे. त्यासाठी फार वाटही पाहावी लागणार नसल्याचे कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. लक्ष्मण हाके यांच्या आंदोलना संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बोलणं होऊ शकलं नाही, मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत बोलणे झाले आहे. लवकर यावर निर्णय घ्यावा अशी विनंती केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
शेतकरी खते बियाण्यासाठी रांगेत उभे होते. आणि मंत्री परदेशात गेले होते, इतके हे सरकार कपाळ करंटे हे सरकार आहे. सबसिडी देतो म्हणतात, मात्र सर्व दर वाढवण्यात आले आहेत. खरिप हंगामाची बैठक झालेली नाही. हे पापी सरकार कधी जाईल याची वाट शेतकरी पाहत असल्याची टीकाही विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. महायुतीचे सरकार तीन चाकी रिक्षेच हे सरकार आहे. यातील डिझाईन अशी आहे की कोणतंही चाक काढलं तरी बंदच पडणार आहे. त्यामुळे एकच चाक न काढता तीनही चाकं काढावी आणि आहे त्या ठिकाणी रिक्षा ठेवावी अशी उपरोधिक टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. उज्वल निकम यांची नियुक्ती ही राजकीय नियुक्ती आहे. मात्र एवढ्या लवकर नियुक्ती करण्याचा पुळका का आला ? ते भाजपाचे उमेदवार होते असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.