शेतकऱ्यांच्या संसाराची होळी होत होती आणि इकडे नेते रंग उधळत होते, छगन भुजबळ सडकून टीका…

| Updated on: Mar 08, 2023 | 10:39 AM

नाशिकसह राज्यातील शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान बघता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार छगन भुजबळ आक्रमक झाले असून धुळवडीवरुन सडकून टीका केली आहे.

शेतकऱ्यांच्या संसाराची होळी होत होती आणि इकडे नेते रंग उधळत होते, छगन भुजबळ सडकून टीका...
Image Credit source: Google
Follow us on

मुंबई : राज्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे ( Farmer Loss ) नुकसान केले आहे. त्यावरून गुजरातच्या धर्तीवर महाराष्ट्रातही निर्यात अनुदान, वाहतूक अनुदान द्यावे अशी मागणी करत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) हे आक्रमक झाले आहे. छगन भुजबळ यांनी सरकारकडे मागणी करत असतांना अवकाळी पाऊस आणि होळी यावरून सरकारला चिमटे काढले आहे. अवकाळी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून तो हवालदिल झाला आहे. त्याच्या संसाराची होळी झालेली आहे. आणि इकडे नेते रंग उधळत आहे असा टोलाही छगन भुजबळ यांनी लावत गुजरात सरकार प्रमाणे महाराष्ट्रातही अनुदानाच्या बाबत निर्णय व्हावा अशी मागणी केली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस आमदार छगन भुजबळ यांनी कांदा, द्राक्ष यांसह राज्यातील सर्वच पिकांचे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यावरून छगन भुजबळ यांनी मदत मिळावी यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यावेळी त्यांनी गुजरातच्या सरकारचा संदर्भ दिला आहे.

महाराष्ट्रापेक्षा गुजरात लहान आहे. पण त्यांच्या सरकारने कांदा पिकाला अनुदान दिले आहे. वाहतुकीसाठी अनुदान दिले आहे. तर दुसरीकडे निर्यातीसाठी सुद्धा अनुदान दिले आहे. याशिवाय आपल्या पेक्षा कांदा पीक त्यांच्याकडे फारच कमी असतांना ते मदत करत आहे तर आपण का करू नये अशीही मागणी भुजबळ यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा

याशिवाय राज्यात नाफेडकडून केली जाणारी खरेदी ही बाजारसमितीत जाऊन केली जात नाही. परस्पर कंपनीच्या माध्यमातून बाहेरच्या बाहेर खरेदी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असल्याचा मुद्दा मांडत भुजबळ यांनी कांदा पिकाला अनुदान मिळालेच पाहिजे अशी मागणी केली आहे.

सलग दोन दिवस आलेल्या पावसाने कांदा, द्राक्षबागा, डाळिंब आणि भाजीपाला सर्व खराब झाले आहे. द्राक्ष बाग लाखों रुपये खर्च करून उभी केली जात असते. आता तीन चार वर्षे पीकही नसेल आणि बागा उभ्या करण्याचा खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे.

शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून तो हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांचा आयुष्याचा बेरंग झाला आहे. मात्र दुसरीकडे नेते रंग उधळत होते, अशी टीका छगन भुजबळ यांनी करत असतांना सरकारला टोला लगावला आहे. आज विधानसभेत शेतकऱ्यांचा मुद्दा मांडणार असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हंटले असून कांदा प्रश्नी भुजबळ पुन्हा आक्रमक होणार आहे.