मुंबई : मोर्चाची जास्त प्रसिद्धी होऊ नये, माध्यमांचे आणि लोकांचे लक्ष विचलित होऊ नये यासाठी भाजप माफी मांगो हे आंदोलन करून खटाटोप करत आहे असं राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी म्हंटलं आहे. चुका त्यांनी केल्या, राज्यपाल यांच्यापासून मंत्र्यांपर्यन्त चुका करत आहे, सरकार चुका करत आहे, आणि आम्ही काय माफी मागायची असा प्रतिसवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. भाजपचा दिखावा आणि महामोर्चाचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजपची नाटकं असल्याचे भुजबळ यांनी म्हंटल आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही आमची दैवत आहे. आणि त्यांचा अपमान होतोय हे आम्ही सहन करणार नाही. ते आजही सगळ्यांच्या हृदयात आहेत, आदर आणि भक्तिभाव आहे त्यामुळे मिरवणूक काढतात तशी यमी मिरवणूक काढली आहे. कार्यकर्त्यांना अडवलं जात नाही, कार्यकर्ते उशिरा निघाले आहे. ट्रेनने येताय त्यामुळे थोडा उशीर होत असल्याचे भुजबळ यांनी म्हंटले आहे.
सत्ताधारी पक्ष आंदोलन करून महामोर्चाला छेद देऊ शकत नाही. लोकांना सगळं कळतं आहे, कोणी आधी मोर्चा जाहीर केला, आधी कोण बोललं हे सगळं लोकांना कळतं आहे.
महामोर्चा हे पहिलं पाऊल आहे. शेवटचं नाही. हे आंदोलन आक्रोश आहे. याची तीव्रता हळूहळू पाहायला मिळणार आहे. याचे पडसाद हळूहळू वाढत जातील.
हिवाळी अधिवेशनात सुद्धा या आंदोलनाचे पडसाद पडतील, हे सर्व लॉक रस्त्यावर उतरत आहे, बाहेर जाणारे कारखाने, महापुरुषांचा अपमान हे सगळे विषय अधिवेशनात मांडणार आहोतच.
असा हल्लाबोल राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. मोर्चात सहभागी झाल्यानंतर छगन भुजबळ यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.