रामकुंडावर छटपूजेला परवानगी नाही; कोरोना प्रसार टाळण्यासाठी नाशिक पोलिसांचा निर्णय

| Updated on: Nov 09, 2021 | 1:31 PM

नाशिकमधील रामकुंडावर उद्या होणाऱ्या छटपूजेला पोलिसांनी परवानगी नाकारली असून, कोरोना प्रसार टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

रामकुंडावर छटपूजेला परवानगी नाही; कोरोना प्रसार टाळण्यासाठी नाशिक पोलिसांचा निर्णय
रामकुंड, नाशिक.
Follow us on

नाशिकः नाशिकमधील रामकुंडावर उद्या होणाऱ्या छटपूजेला पोलिसांनी परवानगी नाकारली असून, कोरोना प्रसार टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

उत्तर भारतीयांमध्ये छट पूजेला मोठे महत्त्व असते. नाशिकमध्ये हजारो उत्तर भारतीय आहेत. ते दरवर्षी मोठ्या उत्साहात रामकुंडावर छटपूजा साजरी करतात. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून नाशिककरांना कोरोनाने हैराण केले आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेने नागरिकांचे प्रचंड हाल केले. अनेकांना मृत्यूने गाठले. अजूनही नाशिक जिल्ह्यातल्या काही तालुक्यात विशेषतः सिन्नर, निफाड, येवल्यामध्ये रुग्ण वाढत आहेत. ते पाहता पोलिसांनी उद्या बुधवारी रामकुंडावर होणाऱ्या छटपूजेला परवानगी नाकारली आहे. पंचवटी पोलीस ठाण्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यंदा छटपूजा ही घरीच करावी, असे आवाहन नाशिक पोलिसांनी केले आहे.

कोरोनाला वेसण घालणार

नाशिक जिल्ह्यात कोरोना शून्यावर आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत 100 टक्के कोरोना लसीकरण करावे, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे आणि जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना दिले आहेत. त्यामुळे राज्यात विक्रमी लसीकरण करणाऱ्या नाशिक विभागात येत्या काळात या मोहिमेची गती अजून वाढणार आहे. त्याची सुरुवात आजपासून करण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यात एकही डोस न घेतलेले किती जण आहेत, दुसरा डोस किती जणांचा राहिला आहे याची माहिती गोळा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. आज सोमवारपासून जिल्ह्यात तब्बल 474 केंद्रावर लसीकरण सुरू ठेवण्यात आले आहे.

लस घेण्यासाठी प्रोत्साहन

आदिवासी पाड्यावरील ग्रामस्थ, लस घेण्यासाठी टंगळमंगळ करणारे, दुसरा डोस घेण्यासाठी इच्छुक नसणाऱ्या व्यक्तींचे आशा कर्मचारी, नगरपालिका आणि महापालिका आरोग्य कर्मचारी प्रोत्साह वाढवून त्यांना लस घेण्यासाठी तयार करणार आहेत. नाशिक विभागात नाशिकसह अहमदनगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार हे जिल्हे येतात. त्यात अहमदनगर जिल्ह्यात 22 ऑक्टोबरपर्यंत एकूण 32 लाख 52 हजार 514 जणांचे लसीकरण करण्यात आले असून, यामध्ये 24 लाख 10 हजार 016 जणांनी पहिला डोस घेतला असून 08 लाख 42 हजार 498 जणांनी सरा डोस घेतला आहे. (Chhatpuja on Ramkunda is not allowed; Decision of Nashik Police to prevent the spread of Corona)

इतर बातम्याः

कोरोनाकाळात सेवा बजावणाऱ्या 983 कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान नाही; नाशिक पालिकेच्या महासभेत मुद्दा गाजणार

ST Strike: नाशिक जिल्ह्यात 2100 बस फेऱ्या रद्द; खासगी प्रवासभाडे झाले चौपट, चाकरमानी कोंडीत