छत्रपती संभाजीनगर : BRS पक्ष राज्याच्या राजकारणात सक्रीय होत आहे. काल केसीआर यांची पंढरपूरमध्ये जाहीर सभा झाली. तसंच केसीआर यांनी विठ्ठल मंदिरात जात दर्शन घेतलं. केसीआर यांच्यासाठी मटणाचादेखील बेत आखण्यात आला होता. यावर ठाकरे गटाचे नेते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी टीका केली आहे. तसंच पत्राचाळ कथित घोटाळा प्रकरणावरही दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
चिकन-मटण खाऊन, कोंबड्या कापून केसीआर पंढरपूरला गेले. केसीआर यांनी खोटी भक्ती दाखवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी ध्यानात घ्यावं की महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये फरक आहे. इथली जनता या गोष्टी स्विकारणार नाही, असं अंबादास दानवे म्हणालेत.
एक जुलैला शिवसेनेचा ठाकरे गट मुंबई महापालिकेवर मोर्चा काढणार आहे. त्यावर बोलताना काहीही झाल तरी मोर्चा होणारच आहे. कित्येक वेळेस परवानग्या न घेता मोर्चा काढलेला यापुर्वीही असे मोर्चे काढले आहेत. सरकार काय करणार परवानगी म्हणजे एक कागद आहे, असं दानवे म्हणाले.
संजय राऊत घाबरणार नाही, राजकीय हेतूने ह्या सर्व गोष्टी होत आहे. आता जामीन रद्द होऊ शकणार नाही, ते लढाऊ नेते आहेत, असं म्हणत पत्राचाळ प्रकरणावर अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दुध व्यावसाय खरेदी करण्याची यंत्रणा सरकारकडे नाही, फक्त दिखावा सुरू आहे. सरकार ईडीच्या माध्यमातून राजकीय नेते नव्हे तर अधिकाऱ्यांवर दबाव आहे. शासकीय अधिकाऱ्यांनी काम करावं की नाही, सचिन सावंत कोणत्या प्रकरणात अटक झाली मला माहित नाही, असं म्हणत आयआरएस अधिकारी सचिन सावंत यांच्या अटकेवर अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मविआची बैठक आहे माहिती आहे. यात संघटनात्मक पदाधिकारी सहभागी होणार आहेत. पक्षप्रमुख ठरवतील कोणाला पाठवायच संजय राऊत यांचा बैठकीसंदर्भात विधान मला माहित नाही, असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडी बैठकीवर भाष्य केलंय.
दबंग आयएएस अधिकारी अशी ओळख असलेल्या सुनील केंद्रेकर राजीनामा दिला आहे. त्यावरही अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुनील केंद्रेकर एक मराठवाड्याच्या मातीशी जुळलेले आहेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण आहे. त्यांनी एक रिपोर्ट केला यावर सरकारला काही सुचना केल्या. याच्या बातम्या आल्यात. याचा सरकारमधील लोकांना त्रास झाला यामुळे केंद्रेकरांना यामुळे राजीनामा द्यायला भाग पाडले. केंद्रेकर स्वाभिमानी आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा सरकारच्या तोंडावर फेकून मारला. ही स्वेच्छा निवृत्ती नाही त्यांना बळजबरीने राजीनामा द्यायला लावला असेल, असा गंभीर आरोप दानवे यांनी केला आहे.